एक्स्प्लोर

कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?

सध्या इन्स्टाग्रामवर तुम्ही अनेक कलाकारांच्या पोस्टवर तसेच अनेक कंटेट क्रिएटर यांच्या अकाऊंटवर चहा बनवत असल्याचे व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत.

Ghee chai trend: तुपातले अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण आजकाल समाजमाध्यमांवर अनेक कलाकार त्यांच्या  सौंदर्याचं कॉफीत तुप घालत असल्याचं सांगतायत. वजन कमी करण्यासाठी तुपाच्या कॉफीचं सेवन करत असल्याचं अनेकजण सांगत आहेत. तुपाचा चहा किंवा तुपाची कॉफी आरोग्यदायी असल्याचंही यात सांगण्यात येतं. मासिक पाळीत आराम मिळावा यासाठी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हावा यासाठी चमचाभर तुप टाकण्याचा सल्ला सोशलमिडियातून अनेकजणी देताना दिसतात. हे कितपत फायदेशीर आहे? तुपातला चहा किंवा कॉफीचा प्रकार नक्की काय आहे? चला जाणून घेऊया..

सध्या इन्स्टाग्रामवर तुम्ही अनेक कलाकारांच्या पोस्टवर तसेच अनेक कंटेट क्रिएटर यांच्या अकाऊंटवर चहा बनवत असल्याचे व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे चहा किंवा कॉफी बनवल्यानंतर त्यात ते चमचाभर तूप टाकत आहेत. मासीक पाळीत होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो असं यातील अनेकांचं मत आहे. यासाठी अनेकजण या चहा, कॉफीची रेसिपीही शेअर करत आहेत. कृती सेनॉनसह अनेक कलाकारच नाही तर आहारतज्ञही ही कॉफी पित असल्याचं सांगत आहेत. 

तुपात बनवलेला चहा खरंच फायद्याचाय का?

तुपापासून बनवलेला चहा किंवा कॉफी खरंच फायद्याची आहे का? याविषयी अनेकजण पोस्ट करत असले तरी काही आहारतज्ञांच्या मते तुपापासून बनवला जाणारा चहा हा फायदेशीर आहे. चमचाभर तुपात गुड फॅटस आणि शरिराला आवश्यक संयुगे असतात. जे उठल्याउठल्या शरिरात ऊर्जा निर्माण करतात., पचनाशी संबंधित समस्यावर हा रामबाण उपाय असल्याचंही अनेकजण सांगताना दिसत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Nutri Twin | Dietitian (@nutri_twin)

कसा बनवतात हा चहा?

या चहा कॉफीच्या सर्वांच्या रेसिपी वेगवेगळ्या आहेत. काही जण काढ्यासारखा चहा बनवून त्यात शेवटी अर्धा चमचा साजूक तूप टाकतात. काही जणांना चहा किंवा कॉफीमध्ये दुध टाकायचे नसेल तर काळा चहा किंवा ब्लॅक कॉफीत शेवटी चमचाभर तुप टाकलं जातं.  हा चहा घेण्याचं तुमचं उदिष्ट काय यावर याची रेसिपी आहे. जर पचनासाठी हा चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यात कोऱ्या चहात चिमुटभर ओवा, दालचिनीचा तुकडा असा काढा करून शेवटी त्यात तूप टाकलं जातं. काही जण दुधाच्या चहातही तुप टाकताना दिसतात. 

View this post on Instagram
 
A post shared by 🅺🅰🅸🅻🅰🆂🅷 🅱🅸🆂🅷🅽🅾🅸 (@kailashayogastudiorishikesh)

मासिक पाळीच्या वेदना होतात कमी

तुपातला चहा पिल्यानं मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होऊन दुखण्यावर आराम पडतो असंही काही जणांचं म्हणणं आहे. इन्स्टाग्रॅमवर याबाबत अनेकजण पोस्ट करत असून रकुल प्रीत, कृती सेनॉन अशा कलाकारांसह अनेक आहारतज्ञांनीही याबाबत पोस्ट केल्या आहेत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री  घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका
महाराष्ट्र वाऱ्यावर? नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका
Pune Ganpati Visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणूक एकदाची संपली, 28 तास पोलिसांची कसोटी, शेवटचा गणपती अलका चौकातून  मार्गस्थ
पुण्यातील विसर्जन मिरवणूक एकदाची संपली, 28 तास पोलिसांची कसोटी, शेवटचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ
Success story:हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती
हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती
One Nation One Electionमुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार? भाजपचा नेता म्हणाला, हा निर्णय म्हणजे  मदर ऑफ पॉलिटिकल रिफॉर्मस
One Nation One Election धोरणामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ होणार, भाजपच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 September 2024: ABP MajhaOne Nation One Electionकेंद्रीय कॅबिनेटकडून 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मान्यता: विश्वसनीय सूत्रNawab Malik Son in law Sameer Khan Accident : समीर खान यांच्या अपघाताचा CCTV;कारने नेलं फरफटतYashomati Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री  घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका
महाराष्ट्र वाऱ्यावर? नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका
Pune Ganpati Visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणूक एकदाची संपली, 28 तास पोलिसांची कसोटी, शेवटचा गणपती अलका चौकातून  मार्गस्थ
पुण्यातील विसर्जन मिरवणूक एकदाची संपली, 28 तास पोलिसांची कसोटी, शेवटचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ
Success story:हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती
हा उद्योजक कमावतो वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याकाठी 4 लाख रुपये, वापरली ही भन्नाट युक्ती
One Nation One Electionमुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार? भाजपचा नेता म्हणाला, हा निर्णय म्हणजे  मदर ऑफ पॉलिटिकल रिफॉर्मस
One Nation One Election धोरणामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ होणार, भाजपच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Pune Crime News: ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ
Vladimir Putin : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे रशियन जनतेला शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन; नेमकी टायमिंग सुद्धा सांगितली!
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे रशियन जनतेला शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन; नेमकी टायमिंग सुद्धा सांगितली!
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
Embed widget