एक्स्प्लोर
Winter Tips : सावधान! हिवाळ्यात गीझरच्या पाण्याने आंघोळ करताय? मग 'हे' वाचा
Geyser Safety Tips : तुम्ही गिझरचा वापर करत असाल तर, तुम्हाला काही सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Tips to Use Geyser Correctly : हिवाळा सुरु झाला आहे. थंडीच्या मोसमात गरम पाण्याने आंघोळ करण्याला प्राधान्य दिले जाते. थंडी सुरु होताच वॉटर हिटर (Water Heater) आणि गीझरचा (Geyser) वापर वाढतो. हिवाळ्यात आंघोळ करणे हे जणू एक आव्हान असते. त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी गॅसवर पाणी तापवण्याऐवजी गीझरचा सोपा पर्याय निवडला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हिवाळ्यात गीझरचा वापर करत असाल तर तुम्हाला काही सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
गीझरच्या पाण्याने आंघोळ करताना अशी घ्या काळजी
- थंडीच्या मोसमात आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे तुम्हीही घरात गीझर लावले असेल तर ते वापरल्यानंतर ते बंद करायला विसरू नका.
- अतिउष्णतेमुळे गीझरचा स्फोट होण्याचा धोका असतो. नवीन तंत्रज्ञान असलेले ऑटोमॅटिक गीझरमध्ये पाणी गरम झाल्यानंतर ऑटो मोडमध्ये आपोआप बंद होतात. पण तुम्ही जुना गीझर वापरत असाल तर तुम्ही वेळेवर गीझर बंद करायला विसरू नका.
- गीझर अनेक वर्षांपूर्वी बसवलेला असेल आणि मागच्या वर्षी हिवाळ्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच वापरला जाणार असेल, तर गीझरची सर्व्हिसिंग केल्याशिवाय त्याचा वापर करु नका. गीझरची वायर तांब्याची नसेल तर गीझर फुटण्याची शक्यता जास्त असते. गीझर लावल्यानंतर अर्थिंग योग्य आहे की नाही ते तपासा.
- विजेचा झटका टाळण्यासाठी सुमारे 10 ते 15 मिनिटे आधी गीझर चालू करा आणि पाणी गरम करा. तुम्ही बादलीत गरम पाणी ठेवून त्याने आंघोळ करु शकता.
- अनेकदा लोक पैसे वाचवण्यासाठी स्वस्त गीझर खरेदी करतात, पण तुम्ही ही चूक करु नका. स्वस्त गीझर पूर्णपणे सुरक्षित नसतात. गीझर खरेदी करताना ISI चिन्हांकित गीझर निवडा. तसेच बाथरूममध्ये गीझर बसवण्यासाठी मेकॅनिकची मदत घ्या आणि स्वतः गीझर बसवणे टाळा.
- गीझरची तार तांब्याची नसेल तर त्याचा स्फोट होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे गिझर लावल्यानंतर अर्थिंग योग्य आहे की नाही ते तपासा.
- हिवाळ्याचा मोसम सुरू झाल्यापासून देशभरात गिझर फुटल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही देखील गीझर वापरताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement