(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hair Care : केसांच्या समस्येवर रामबाण उपाय, एकदा 'हे' करुन तर पाहा
Garlic for Hair Care : लसणामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक पुरेसे प्रमाणात असतात. हे घटक केस लांब, जाड आणि मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहेत.
Garlic for Hair Growth : सध्याच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. व्यस्त जीनवशैलीमुळे आपण चुकीच्या सवयीच्या आहारी जातो याचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. परिणामी अनेक समस्या उद्भवतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे केस गळती. सध्या बहुतेक जण केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहे. केसासाठी बाजारात अनेक प्रोडक्टस उपलब्ध आहेत. पण या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रोडक्टसपेक्षा तुम्ही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर करु शकता. तुम्हीही या समस्येपासून त्रस्त असाल, तर यावर तुम्हाला सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय जाणून घ्या.
केसांच्या समस्येवर रामबाण उपाय
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्याचा सोपा घरगुती उपाय म्हणजे लसूण. प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात लसूण सहज उपलब्ध असते. लसूण आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्याचप्रमाणे लसूण त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. लसणामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे केस लांब, जाड आणि मजबूत मदत होते.
लसणाच्या रसाचे फायदे
केस मजबूत होण्यास मदत
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण हा सोपा आणि रामबाण उपाय आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लसणामध्ये सेलेनियम आणि सल्फर आढळते, हे केसांच्या मजबुतीसाठी फार आवश्यक असते. त्यामुळे केसांना लसणाचा रस लावल्याने केस मजबूत होतात. केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर केसांमध्ये लसणाचा रस वापरणे खूप उपयुक्त ठरु शकते.
केसगळतीच्या समस्येला रामराम
जर तुम्ही केस गळतीमुळे त्रस्त असाल तरीही तुम्ही केसांना लसणाचा रस लावून पाहा, तुमची समस्या नक्की दूर होईल. लसणाच्या वापरामुळे केसगळतीपासून सुटका मिळेल. लसणामधील गुणधर्म केसगळती रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
केसातील कोंडा दूर होईल
कोंड्याच्या समस्येवरही लसूण हा उत्तम उपाय आहे. लसणाचा रस केसांना लावल्याने त्याचा खूप फायदा होतो. लसणाचा रस लावल्याने टाळू आणि केसांमध्ये जमा झालेला कोंडा दूर होतो आणि खाज येण्याची समस्याही दूर होते.
कोरड्या केसांची समस्या करा दूर
लसणाचा वापर केल्यावर केस रुक्ष होण्याची समस्याही दूर होते. सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेप्रमाणेच केसांनाही हानी पोहोचवतात. हानिकारक युव्ही किरणांमुळे केसांमधील नैसर्गिक केरेटीन प्रोटीनही हळूहळू कमी होते, ज्यामुळे केस वाळतात. यावर उपाय म्हणून तुम्ही केसांवर लसणाचा रस वापरु शकता. त्यामुळे केसांचे संरक्षण होते आणि कोरड्या केसांची समस्या दूर होऊन केस मजबूत आणि चमकदार होतील.
केसांची वाढ होते
लसणात अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात केसांची वाढ होण्यास खूप मदत होते. लसणाचा रस केसांना लावल्यास केसांची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी लसूण खूप उपयोगी आहे.
लसणाचा रस कसा तयार कराल?
लसणाचा रस बनवण्यासाठी लसणाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्या सोलून घ्या. आता लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करा. आता हा रस गाळून घ्या. एका वाटीत एक चमचा लसणाचा रस, एक चमचा नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करा. आता हे तेल टाळूला आणि केसांना लावा. 15 मिनिटे ते 20 मिनिटे ठेवून त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. काही दिवसात याचा वापर करुन तुम्हाला फरक जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Zero Calorie Sugar : सावधान! झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक, हृदयविकाराचा वाढता धोका
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )