एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या विविध नावांचा अर्थ नेमका काय? जाणून घ्या अर्थ-अन्वयार्थ     

Ganesh Chaturthi 2022 : गणपतीला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. पण, या नावामागचा नेमका अर्थ काय? हा अनेकदा आपल्याला माहीत नसतो.

Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाचा (Ganesh Chaturthi 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. गणपतीला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. पण, या नावामागचा नेमका अर्थ काय? हा अनेकदा आपल्याला माहीत नसतो. गणेश सहस्रनाम अर्थात हजार नावे.  याच निमित्ताने आम्ही तुम्हाला आजपासून रोज गणपतीची वेगवेगळी नावं आणि त्यांचे अर्थ नेमके काय हे सांगणार आहोत. 

श्री. गणेशाची नावं : अर्थ-अन्वयार्थ     

1. गणेश्वर : गण याचे अनेक अर्थ आहेत, गणातील कोणत्याही गणांचा पती या अर्थाने गणेश सर्वाधीश आहेत

2. गणक्रीडा : समस्त गणांशी क्रीडा करतात असे

3. गणनाथ : सर्व गणांचे नाथ, सर्वांचे स्वामी

4. गणाधिप : सर्वगणांवर ज्यांची अधिसत्ता चालते ते

5. एकदंष्ट्र : एकदन्त असा ज्याची मायेवरही सत्ता चालते

6. वक्रतुंड : वक्र मुखाचा असा वक्रतुंड जो मायापटलध्वस्त करतो

7. गजवक्त्र : गजचा उलट अर्थ जग जे दु:खाने व्यापले त्यात गजमुखी निर्गुण रुपी आनंद देतो

8. महोदर : उदरात राहून समस्त भोगांचा आस्वाद घेतो, मात्र ज्यात आत कोणी नसते, ज्यापेक्षा सूक्ष्म तत्व काहीही नसते

9. लंबोदर : ज्या उदरात अनंतकोटी ब्रह्मांड जन्माला येऊन, खेळून लुप्त होतात

10. धूम्रवर्ण : बाह्यरुपी समजून घेताना, ज्यांचे यथार्थ रुप सहजी कळत नाही धूम्रवर्ण

11. विकट : माया ज्यांच्यापासून वि-गत अर्थात दूर झालेली असते

12. विघ्ननायक : भवबंध, संसार, भवसागरातल्या विघ्नांवर ज्याची सत्ता चालते आणि विघ्न दूर होते

13. सुमुख : मुखचा अर्थ प्रारंभ, ज्यांच्या नामोच्चारणाने कार्यारंभ शुभ होतात असे

14. दुर्मुख : मुखचा अन्य अर्थ ओळख, ज्यांची ओळख अतीव कष्टप्रद, गहन आहे असे

15. बुद्ध : नित्यज्ञानरुप, अविघ्यानाशक

16. विघ्नराज : अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक त्रिविधविघ्नांवर ज्यांची सत्ता चालते ते 

17. गजानन : चार वेदांचे अंतिम वर्ण मिळून निर्मित नाम आहे गजानन

18. भीम : भयानक, अर्थात दुष्टांसाठी कष्टप्रद

19. प्रमोद : आनंद, तो आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर लाभतो त्याला प्रमोद म्हणतात

20. आमोद : इच्छित वस्तूच्या प्राप्तीसाठी निश्चय झाल्याने प्राप्त झालेल्या आनंदाला आमोद म्हणतात, बुद्धिपतीद्वारे अत: श्रीगणेशास आमोद म्हणतात

21. सुरानंद : सूर अर्थात देवता, या देवतांना आनंदप्रदान करणारे सुरानंद

22. मदोत्कट : सगळ्यांचा मद ज्या चरणी उत्कट होतो आणि गळून जातो ते

23. हेरंब : हे म्हणजे जगत् आणि रम्ब म्हणजे संचालक, जो जगत्संचालक असा तो

24. शम्बर : शम् म्हणजे कल्याण आणि वर श्रेष्ठतम, ज्याच्या चरणी परमकल्याण लाभते ते

25. शम्भू : भू धातूचा अर्थ निर्माण होणे, ज्याच्याद्वारे सर्व कल्याणकारी बाबी निर्माण होतात

26. लम्बकर्ण : भक्तजनांची आर्त हाक  प्रदीर्घ अंतरावरुनही श्रवण करणारा असा तो

27. महाबल : अद्वितीय शक्तीशाली

28. नन्दन : सकलसुखदाता

29. अलम्पट : अलम् म्हणजे परिपूर्ण, लम्पट म्हणजे मागे लागणारा, जो कशाचीही इच्छा नसणारा, परिपूर्ण असा अलम्पट 

30. अभीरु : भीरु म्हणजे घाबरट, अभीरु म्हणजे भयरहीत

31. मेघनाद : ज्याचा ध्वनी घनगंभीर आहे असा

32. गणंजय : सकल शत्रूवर विजय मिळवणारा, विकारगणांना वश करुन ठेवणारे गणंजय

33. विनायक : सगळ्या ईश्वर महेश्वरादिकांचे विशेषनायक म्हणजेच ज्यांवर कोणीही नायक नाही असा

34. विरुपाक्ष : विरुप म्हणजे दिसण्यास कठीण, रुप म्हणजे दिसणारी बाब, सामान्य डोळ्यांना न दिसणारे असे ते विरुपाक्ष

35. धीरधूर : धैर्याने, शौर्याने परमसंपन्न

36. वरप्रद : भक्तांना सुयोग्य वरदान प्राप्त करणारा असा

37. महागणपती : अगणित जीवांवर ज्याची सत्ता चालते

38. बुद्धिप्रिय : बुद्धी म्हणजे मोक्षप्रदायिका विद्या, अर्थात भगवती बुद्धिचे जो प्रिय असा तो

39. क्षिप्रप्रसादन : क्षिप्र अर्थात शीघ्र, त्वरित प्रसन्न होणारा तो 

40. रुद्रप्रिय : श्रीशंकरांना परमप्रिय असणारे

41. गणाध्यक्ष : विविध गणांचा अध्यक्ष

42. उमापुत्र : भगवती पार्वतीचे पुत्र

43. अघनाशन : अघ म्हणजे पाय, मल, विकृतींचा नाश करणारे, घन म्हणजे प्रचंड अघन म्हणजे अल्पस्वल्प बाबींनीही तृप्त होणारे

44. कुमारगुरु : कुमार अर्थात कार्तिकेय, त्यांचे ज्येष्ठ भ्राता, तर अतिदिव्य ब्रह्मर्षींना आत्मविद्याप्रदान करणारे

45. ईशानपुत्र : ईशान म्हणजे शंकर, त्यांचे पुत्र ते ईशानपुत्र

46. मूषक वाहन : मूषक म्हणजे उंदीर त्याचप्रमाणे शरीराच्या आत राहून भोगांच्या स्वाधीन असलेला मूषक, त्याच्यावर ज्याचा अधिकार तो मूषक वाहन

47. सिद्धिप्रिय : ज्यांना सिद्धि प्रिय असतात, ज्यांच्या जवळ सिद्धि असतात असे ते

48. सिद्धिपती : चौसष्ट कोटी अर्थात चौसष्ट प्रकारच्या सिद्धि, कला- विद्या ज्याच्या अधिपत्याखाली

49. सिद्ध : ज्ञानाने स्वत: सिद्ध असलेला

50. सिद्धिविनायक : जे भक्तांना धर्मार्थकाममोक्षप्रदान करतात ते 

51. अविघ्न : अविचा अर्थ पशु, पशुचा, पशुत्वाचा नाश करतो तो अवि-घ्न

52. तुंबरु : तुंबरु म्हणजे तंबोरा, ज्याच्या आधराशिवाय संगीतकार, गायक तान छेडूच शकत नाहीत

53. सिंहवाहन : विविध युगापैकी एका युगातला अवतार, तर दुसरा अर्थ सिंह पशूंचा राजा, जीवांचा नायक, त्या सकल नायकावर आरुढ असणारा

54. मोहिनीप्रिय : देवी सिद्धी या जगताला मोहित करते अतः तिला मोहिनी म्हणतात, त्या सिद्धीचा नाथ

55. कटंकट : कट म्हणजे आवरण, अज्ञानानर आवरण घालणारा अर्थात अज्ञानाचा नाश करणारा

56. राजपुत्र : द्वापार युगात गजाननाने राजा वरेण्याच्या पुत्ररुपाने  अवतरले होते, त्या अर्थी राजपुत्र

57. शालक : ज्याला पूर्णतः जाणणे इंद्रियांना अशक्यप्राय आहे असे मनोवाणीअतीत तत्व

58. सम्मित : मित म्हणजे मोजणे, सम् संपूर्ण-सुयोग्य हा उपसर्ग, जो अनंतकोटी ब्रह्मांडांनी पूर्णतः व्यापूनही 'दशांंगुले' उरलेला आहे

59. अमित : ज्याला कशानेही मोजता, व्यापता, झाकता येत नाही तो अमर्याद परमात्म्या

60. कूष्मांडसमासंभूती : कूष्मांड हा यज्ञ. यामध्ये सामवाणी उच्चारताना प्रगट होणारे भाव

61. दुर्जय : ज्यांना कोणीच जिंकू शकत नाही

62. धूर्जय : जगाचा गाडा चालविणारा सकललोक संचालक

63. जय : सकल विजयाचे स्वरुप असणारा

64. भूपती : भू म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचे पती पालक

65. भुवनपती : चतुर्दशभुवनात्मक सृष्टीचे पालक

66. भूतानांपती : पंचमहाभूतांचे पालक

67. अव्यय : व्यय म्हणजे खर्च होणे कमी होणे, क्षय होणे परंतू परब्रह्म तत्व परिपूर्ण असल्याने त्याचे रुप अव्यय

68. विश्वकर्ता : अनंतकोटी ब्रह्मांडांचे निर्माते

69. विश्वमुख : विश्वरुपी उतरंडीचा आरंभ ज्याच्यापासून होतो तो

70. विश्वरुप : रुप म्हणजे आकार घेणे. या जगताच्या रुपात जे सगुण साकार सावयव झालेले रुप

71. निधी : सर्व भौतिक वैभवाच्या बाबी ज्याच्या चरणी लीन असतात

72. घृणी : घृ म्हणजे प्रकाशणे, स्वयंप्रकाशित तथा अन्यांस प्रकाशित करणारा असा...

73. कविः : कवी म्हणजे रचियता, अनंतकोटी ब्रह्मांडांची हवी तशी रचना करणारा

74. कवीनाम् ऋषभः : ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, अनंतविश्वाचा निर्माता तो

75. ब्रह्मण्य : ब्रह्मतत्वाशी संबंधित ब्रह्मण्य

76. ब्रह्मणस्पती : अन्नब्रह्म, प्राणब्रह्म,मनोब्रह्म, आनंदब्रह्म इ. समस्त ब्रह्मांचे पती

77. ज्येष्ठराज : ज्येष्ठ म्हणजे महान, इंद्रचंद्रादिकांपेक्षा ब्रह्माविष्णू महेश्वरादी परमेश्वर ज्येष्ठ, या सगळ्यांपेक्षाही जो ज्येष्ठ

78. निधिपती : पूर्वोक्त नवविध निधींचे पालक-मालक

79. निधिप्रियपतिप्रिय : कुबेरादिक देवतांनाही जे प्रिय ते

80. हिरण्यपुरान्तस्थ : देहाच्या आत वा ह्रदयाकाशात श्रीगणेश असतात ते 

81. सूर्यमण्डलमध्यग : सूर्य अर्थात तेज, समस्त तेजाच्या तथा ज्ञानाच्या अधिष्ठानरुपात प्रकाशित असणारा

82. कराहतिध्वस्तसिन्धूसलिल : भवसागर, संसारसागर त्याचा विध्वंस करणारा

83. पूषदन्तभिद् : दक्षयज्ञविध्वंस समयी शिवाचे आत्मतेज वीरभद्र रुपात प्रगटले तथा त्यांनी पूषानामक देवतेचे दात पाडले त्या अर्थी

84. उमांककेलिकुतुकिन् : उमा देवीपार्वती त्यांच्या मांडीवर केली म्हणजे बाललीला करण्याचे ज्यांना करण्याचे कौतूक वाटते

85. मुक्तिद : भवबंधनातून युक्ती प्रदान करणारे

86. कुलपालन : कुल अर्थात वंश, धर्मनिष्ठ कुळांचा सांभाळ करणारे

87. किरीटी : मस्तकी रत्नमंडित मुकुट धारण करणार

88. कुंडली : कानात कुंडल धारण करणारे शिवाय कुंडलिनी म्हणजे नाभीकमलात वेटोळे घालून बसणारा

89. हारी : भक्तांची विघ्ने, दुःखे नष्ट करणारा भक्तदुःखदायक हारी

90. वनमाला : पायापर्यंत रुळणारी कमळाची माळा - वनज घातलेला

91. मनोमय : मनात आले म्हणून प्रगटले असे रुप मनोमय 

92. वैमुख्यहत्यदैतश्री : दैत्यांच्या, आसुरांच्या अधर्मआचरणाने अप्रसन्न होऊन त्याच्यापासून तोंड फिरवतात असे

93. पादाहतिजितक्षिती : आपल्या पदाहती अर्थात पायाच्या आघाताने क्षिती म्हणजे पृथ्वी जिंकणारे

94. सद्योजत स्वर्णमुंजमेखली : मुंज गवताची दोरी करुन मुंजीत बटूच्या कमरेला बांधतात. म्हणूनच त्या संस्कारास मौजी बंधन म्हणतात. या बंधनातून ज्ञान, वेद, संस्कृती सुचविली जाते याचे अधिष्ठान गणपती असल्याने त्यांनी रोज्या श्ृंगारात अशी मेखला बांधतात 

95. दुर्निमित्तह्रत : दु:स्वप्न अर्थात वाईट स्वप्नांचे विनाशक

96. प्रसहन : भक्तांचे अपराध प्रकर्षाने सहन करणारे

98. गुणी : सद्गुणांचे परमआधार

99. नादप्रतिष्ठित : ओमाकरच्या तीन मात्रांच्या उच्चारानंतर उरतो तो नाद, जो असतो त्रिगुणातीत त्या नादात निवास करणारा

100. सुरुप : लावण्यसंपन्न

101. सर्वनेत्राधिवास : आपल्याला ८३% ज्ञान डोळ्यांनी मिळते अर्थात ज्यांच्यामुळे दिसते, ज्ञान प्राप्त ते भगवान

102. वीरासनाश्रय : तृप्तीचे आसन म्हणजे वीरासन, अत; परमतृप्त गणराज विरासनात बसलेले असतात

103. पीताम्बर : पीतवस्त्रधारण करणारे, अंबर म्हणजे आकाश, समस्तविश्वाला आत्मसात करतो तो 

104. खण्डरद : डावा दात म्हणजे मायेची सत्ता, ती जेथे खंडित होते ते खण्डरद

105. खण्डेन्दुकृतशेखर : इन्दू म्हणजे चंद्र, खण्डेन्दू - चंद्रकोर ती मस्तकावर धारण करणारा

106. चित्रांकशामदशन : दशन म्हणजे दात, गणेशाचे दात शाम म्हणजे सावळे सुंदर असून त्यावर सुंदर चित्रकारी केली आहे जो रत्नमंडित आहे असा चित्रांक

107. भालचंद्र : भालप्रदेशावर - मस्तकावर चंद्रधारण करणारे

108. चतुर्भुज : चार हा, ज्यात पाश-अकुंश, परशू धारण करुन दोन हात दुष्टनिर्दासनकत्व विर्णितात, तर मोदक आणि वरदहस्त सज्जन्नांनाल संतोष देणारे स्वरुप दाखवितात

109. योगधिप : योगाच्या आरंभी अंती ज्याची सत्ता चालते

110. तारकस्थ : तारक म्हणजे ओंकार, तारक म्हणजे तारुन नेणारा 

111. पुरुष : पुर शब्दाचा अर्थ नगर. त्यात राहतो तो पुरुष. देहत्रयरुपी शरीरालाच पुर म्हणतात आणि त्यात निवास करणारा जीवात्मरुप गणनाथ सापेक्षरीत्या पुरुष ठरतात

112. गजकर्ण : हत्तीप्रमाणे विशाल कर्ण असणारा, गज म्हणजे निर्गुणत्वाचाच श्रवण करणारा

113. गणाधिराज : गणांचा अधिराज

114. विजयस्थिर : विजयात निश्चितता असणारा, पराजित न होणारा

115. गजपतिध्वजी : ध्वज व्यक्ती, देश, साम्राज्याची ओळख होते. गजचा निर्गुणार्थ हीच ज्याची ओळख

116. देवदेव : देवांनाही प्राकाशित करणारा तर पूज्यांचे पूज्य, उपास्यांचे उपास्य ते देवदेव

117. स्मरणप्राणदीपक : स्मर अर्थात कामदेव, त्यांना शंकरांनी जाळल्यावर, ज्यांच्याकृपेने त्यांना अनंग अर्थात अंगररहित अस्तित्वप्राप्त झाला तो

118. वायुकीलक : वायू अर्थात प्राण अपान इ. ज्यांच्या कृपेने प्राण-अपान स्तंभन होऊन प्राणवायू अंतरात्म्यात विलीन होतो ते वायुकीलक

119. विपश्चिद्वरद : विपद् अर्थात संकट, कोणत्याही, कशाही संकटात वर प्रदान करतात ते

120. नादोन्नादभिन्नबलाहक : आपल्यावर वारंवार केलेल्या नादांमुळे मेघांना नष्ट करणारे, बलाहक म्हणजे मेघ

121. वराहरदन : वराह शब्दात वर आणि आह असे दोन शब्द. ज्याचा अर्थ सर्वश्रेष्ठ. ज्ञानरुप सत्ताधीश असा जो

122. मृत्युंजय : मृत्यूवर, नाशावर, क्षयावर विजय मिळवणारा

123. व्याघ्राजिनाम्बर : वाघाच्या चर्मावर राजा वा संन्याशीच बसू शकतात, तेही असेपर्यंतच. परंतू राजांचे राजे तथा योग्यांचे योगे म्हणून गणराज व्याघ्राजिनाला वस्ररुपात नेसतात

124. इच्छाशक्तिधर : भगवंतांचे सर्वकार्ये केवळ इच्छामात्रे चालत असतात, त्यात प्रतीक्षा किंवा प्रयास दोन्हींची गरज असते, अशा शक्तीला धारण करणारे

125. देवत्राता : देवतांना संकटातून तारुन नेणारे

126. दैत्यविमर्दन : अधर्माचारी दैत्यांचा विनाश करणारे

127. शम्भुवक्त्रोद्भव : शंकरांना गणेशज्ञान प्रथम झाले आणि मग त्यांनी उपदेश केल्याने इतरांना कळले ते शम्भुवक्त्राद्वारे उद्भवलेले भाव

128. शम्भूकोपहा : 'हा' धातूचा अर्थ नष्ट करणे, श्रीशंकरांदिकांच्या काम-क्रोधादिक भावना ज्याच्या चरणी विलीन होतात

129. शम्भुहास्यभू : शंकरांच्या आत्मानंदरुपी हास्याला प्रगट करणारे

130. शम्भूतेज : कल्याणकारी तेजाने युक्त

131. शिवाशोकहारी : शिवा म्हणजे पार्वती. देवी पार्वतीचा शोक दूर करणारे

132 गौरीसुखावह : देवी गौरीला सुखप्रदान करणारे

133 उमाड्ग्मलज : पार्वती शब्दाचा अर्थ बुद्धी, वृत्ती. त्यावर साचलेला अहंता आणि ममतारुपी मळ दूर झाल्यावर जो प्रगट झाला तो

134. गौरीतेजोभू : अहंममात्मकबन्ध गळून गेल्यावर देवी गौरीला झालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात प्रगटलेले

135. स्वर्धुनीभव : स्वर्धुनी म्हणजे गंगा. ब्रह्मरंध्रस्वरुप स्वर्गातून प्रसविणाऱ्या ज्ञानामृतरुपीगंगेचे प्रगटीकर्ती

136. यज्ञकायो : काया म्हणजे शरीर, अर्थात दिसणारी गोष्ट, तसे यज्ञात जे दिसतात, प्रगटतात ते

137. महानाद : नाद म्हणजे श्रेष्ठतादर्शक आवा, गणेश श्रेष्ठांचेही श्रेष्ठ अत: ते महानाद

138. गिरिवर्ष्मण् : वर्ष्मण् शब्दाचा अर्थ अवयव, पर्वत ज्याचे अवयव असावते अते अतिविशाल देहधारी

139. शुभानन : ज्या मुखाच्या दर्शनाने परमशुभता लाभते असे

140. सर्वदेवात्मन् : सर्व देवतांच्या अंतरंगी विराजित महातत्व

141. सर्वदेवात्मन् : सर्व देवतांच्याही अन्तरंगी विराजित महातत्व.

142. ब्रह्ममूधर्ना : याचे दोन अर्थ आहेत. 1) मूर्धांचा एक अर्थ मस्तक - अर्थात ज्यांचा देह सगुण मानवी आहे. मात्र मस्तक निर्गुण-ब्रम्हरूप गजरूप आहे ते  2) मूर्ध्ना याचा दुसरा अर्थ आहे सर्वात वर 

143. ककुपश्रुती : ककुप् म्हणजे दिशा, श्रुती म्हणजे कान दिशा हेच ज्यांचे कर्ण आहेत ते ककुपश्रुती. 

144. ब्रह्मांडकुम्भ : परिपूर्ण ब्रह्मांडच ज्यांचे कुल आहेत. हत्तीच्या मस्तकावरील उंचवट्यांना कुंभ म्हणतात. 

145. चिद्व्योमभाल : चिन्मय असे आकाश हेच प्रभूंचे भाल अर्थात कपाळ आहे. 

146. सत्यशिरोरूह : सत्यलोक (चतुर्दशभुवनातील सर्वात वरचा स्वर्ग)

147. जगजन्मलयोन्मेशनिमिष : जगताचा जन्म, लय तथा उन्मेष पुन्हा प्रगटणे हेच त्यांचे निमिष अर्थात डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप आहे असे.

148. अग्न्यर्कसोमदृक् : अग्नी, सोम-चंद्र, अर्क-सूर्य हेच ज्यांचे नेत्र आहेत असे.

149. गिरीन्द्रैकरद : गिरी-पर्वत. इंद्र- सर्वश्रेष्ठ. गिरीन्द्र- सर्व श्रेष्ठपर्वत-मेरूपर्वत, तोच ज्यांचा एक-दन्त आहे असे. 

150. धर्माधर्माष्ठ : धर्म आणि अधर्म हेच ज्यांचे ओठ आहेत.  ज्यांच्या वचनांमधूनच धर्म अथर्म स्पष्ट होतात ते. 

151. सामबृंहित : बृंहित म्हणजे गर्जना, सहजहुंकार,    

152. ग्रहर्क्षदशन : ग्रह तथा नक्षत्रे हेच ज्यांचे दात आहेत असे.  

153. वाणीजिव्ह : परा, पश्यन्ती, मध्यमा तथा वैखरी अशा चार प्रकारच्या वाणी ह्याच ज्यांची जीभ आहे असे. 

154. वासवनासिक : वासव म्हणजे इंद्र, तीच जणू त्यांची नासिका असा.

155. कुलाचलांस : अचल म्हणजे पर्वत. त्यांचे कुल म्हणजे समूह.

156. सोमार्कघण्टा : सूर्य आणि चंद्रच ज्यांच्या मुकुटाला किंवा खांद्याला लावलेल्या घण्टा आहेत असे.

157. रूद्रशिरोधर : शिरोधरा म्हणजे मान, जी डोक्याला धारण करतो. रूद्र हीच ज्यांची मान आहे. 

158. नदीनदभुज : नदीच्या पुल्लिंगीरूपात नद म्हणतात. 

159. सर्पागुलिक : शेषनाग इ. सर्प हीच ज्यांची बोटे आहेत असे. 

160. तारकानख : तारका हीच ज्यांची नखे आहेत असे.

161. भूमध्यसंस्थितकर : भुवयांच्या मध्यभागी ज्यांची कर म्हणजे शुंडा. शोभून दिसत आहे असे.

162. ब्रह्मविद्यामदोत्कट : ब्रह्मविद्यारूपी मदखावाने ज्यांचे गंडस्थल ओसंडून वाहात आहे असे. अर्थात ज्यांच्यातून ब्रह्मविद्या वाहते असे. 

163. व्योमनाभी : आकाश हीच नाभी आहे. 

164. श्रीहृदय : वेदांनाच श्री म्हणतात. आध्यात्मविद्येलाच श्री म्हणतात. 

165. मेरूपृष्ठ : मेरू इ. पर्वतच ज्यांचा पाठीचा दांडा आहे. दांडा हा शरीराचा आधार असतो. 

166. अर्णवोदर : समुद्र हेच भगवंताचे उदर आहे. समुद्रातच जीवनाचा आरंभ होतो. 

167. कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्ष : किन्नरमानुष:  : यक्ष, गंधर्व, राक्षस, किन्नर, मानव इ.जीव ज्यांच्या कुशीत राहतात ते जेथे सुरक्षित राहतात तथा जेथून उत्पन्न होतात ते कुक्षिक्षेत्र.

168. पृध्विकटी : पृथ्वी हीच जणू कंबर आहे. पृथ्वीवरच जीव निर्माण होत असल्याने ते प्रभूंचे कटिस्थान आहे. 

169. सृष्टिलिंग : ही सृष्टीच जणू लिंग आहे असे. 

170. शैलोरू : शैल अर्थात पर्वत ह्याच उरू म्हणजे मांड्या आहेत ज्यांच्या असे ते. 

171. दसजानुक : अश्विनीकुमार हेच जणू गुडघे आहेत. 

172. पातालजंघा : सप्तपाताळ ह्याच जणू त्यांच्या जंघा आहेत असे. 

173. मुनिपद : चरणसेवारत मुनी सातत्याने चरणांपाशी असल्याने पदांऐवजी तेच दिसतात म्हणून श्रीगणराज जणू मुनिपद ठरतात. 

174. कालांगुष्ठ : महाकालरूपी पादांगुष्ठ असणारे, जणू काळाला पायांच्या अंगठ्याखाली दाबून ठेवतात हा भाव. 

175. त्रयीतनु : ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांना वेदवयी म्हणतात. 

176. ज्योतिर्मंडललांगुल : तारकामंडलरूपी ज्यांची लांगूल म्हणजे शेपूट आहे असे. शेपटी हा शब्द विस्तार या अर्थी आहे. 

177. हृदयालाननिश्चल : भक्तांच्या हृदयरूपी खांबांना निश्चलपणे बांधले गेलेले, स्थिर झालेले. 

178. हृत्पद्मकर्णिकाशालीवियत्केलिसरोवर : हृत्पद्म-हृदयरूपी कमळ. कर्णिका -कमळाचा गाभा, शाली सुशोभित, सुंदर, वियत्-आकाश केलीसरोवर-क्रीडासरोवर अर्थात 'हृदयकमलातील सुंदर गाभारारूप आकाशात जणू काही  क्रीडा करतात असे ते.'

179. सद्भक्तध्यान निगड : सद्भक्त ज्यांना आपल्या ध्यानात बंदिस्त करून ठेवतात ते. 

180. पूजावारीनिवारित : पूजारूपी साखळीने बांधले जाणारे. 

(माहिती संकलन स्रोत : विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांच्या गणेश सहस्रनाम पुस्तकातून)

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget