एक्स्प्लोर

Fitness Tips : जिमला जाऊन कसेही व्यायाम करु नका, वयानुसार व्यायाम कसा करायचा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Fitness Tips : जिमला जाऊन व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीरच आहे. पण, सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये देखील जिमला जाण्याची क्रेझ वाढत चालली आहे.

Fitness Tips : बदलत्या जीवनशैलीनुसार (Lifestyle) सध्या अनेक आजारांचा धोका वाढत चालला आहे. याच कारणास्तव प्रत्येकजण आपल्या फिटनेसकडे लक्ष देतोय. निरोगी, हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अनेकदा लोक जिमचा पर्याय निवडतात. तरुणांमध्ये जिमला जाण्याची क्रेझही पाहायला मिळतेय. मुलं अॅब्स, सिक्स पॅक आणि बॉडी बनवण्यासाठी जिम (Gym) जॉईन करतात. तर, याऊलट मुलींना स्लिम फिगर हवी असते त्यामुळे त्या जिम जॉईन करतात. पण, जास्त जिम केल्याने तसेच, चुकीच्या पद्धतीने आणि योग्य वयात जिम न केल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? 

खरंतर, जिमला जाऊन व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीरच आहे. पण, सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये देखील जिमला जाण्याची क्रेझ वाढत चालली आहे. अशा वेळी जिमला जाण्याचं योग्य वय नेमकं कोणतं? हे पालकांना आणि मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

जिम जॉईन करण्याचं योग्य वय कोणतं? 

या संदर्भात फिटनेस हेल्थच्या म्हणण्यानुसार, जिममध्ये 16 वर्षांहून जास्त असलेल्या मुलांना हेव्ही वेट ट्रेनिंग दिलं जातं. याचं कारण म्हणजे 16 वर्षांहून कमी असलेल्या मुलांमध्ये हा़डांचा विकास होण्याची प्रक्रिया सुरु असते. यासाठीच हेव्ही वेट ट्रेनिंग करणं त्यांच्यासाठी योग्य वय नाही. पण, या दरम्यान 16 वर्षांखालील मुलं शरीराला फिट ठेवण्यासाठी काही एक्सरसाईझ नक्कीच करू शकतात. 

बॉडी ट्रेनिंग 

16 वर्षांआधी जर तुम्ही जिम जॉईन केली असेल तर तुम्ही फिट राहण्यासाठी बॉडी ट्रेनिंग जसे की, स्क्वॉट्स किंवा फ्लेक्ससारखे एक्सरसाईज नक्कीच करू शकता. त्याचबरोबर 14 ते 17 वर्षांच्या मुलांना फिट राहण्यासाठी तुम्ही जॉगिंग, स्किपिंग, स्विमिंग आणि सायकलिंगसारखे काही एक्सरसाईज करायला सांगू शकता. तसेच, या सर्वात योग अभ्यास देखील करणं तितकंच गरजेचं आहे. कारण शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासही गरजेचा आहे. 

'या' गोष्टींची काळजी घ्या 

  • उत्साहात सुरुवातीलाच जास्त व्यायाम करू नका. तर, हळूहळू व्यायामाला तुमच्या रूटीनचा भाग बनवा. 
  • सुरुवातीलाच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काही सोपे एक्सरसाईज करा.
  • एक्सरसाईज करताना योग्य ट्रेनरच्या देखरेखीखाली केलात तर जास्त फायदेशीर ठरेल. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Hair Care : लांब, सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? पाण्यात फक्त 'या' गोष्टी मिसळून वापरा; सर्व समस्यांपासून सुटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Poha or Upma Benefits : नाश्त्यासाठी पोहे की उपीट योग्य? कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?
नाश्त्यासाठी पोहे की उपीट योग्य? कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?
एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?
एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?
Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...
आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...
Vitrified or Glazed Vitrified Tiles: फुल-बॉडी विट्रिफाइड कि ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स? दोघांमध्ये काय आहे फरक, तुमच्या घरासाठी कोणती सर्वोत्तम? वाचा सविस्तर
फुल-बॉडी विट्रिफाइड कि ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स? दोघांमध्ये काय आहे फरक, तुमच्या घरासाठी कोणती सर्वोत्तम? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Vladimir Putin Meet Xi Jinping:ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
Embed widget