(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fashion : आईच्या जुन्या साडीपासून बनवा भारी ड्रेस! लग्नापासून ते सणांपर्यंत Best ऑप्शन, सर्वांच्या खिळतील नजरा
Fashion : लग्नापासून ते सणांपर्यंत सर्वांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. जास्त मेहनत न करता तुम्ही या आउटफिट्ससह वेगळा लुक मिळवू शकता.
Fashion : प्रत्येक स्त्रीला वेगवेगळे कपडे घालण्याची आवड असते, जर तुम्ही तेच तेच फॅशनचे कपडे घालून कंटाळले असाल, किंवा तुमच्या आईच्या वॉर्डरोबमध्ये कोणतीही जुनी पैठणी, काठापदरची किंवा बनारसी साडी असेल जी आई आता वापरत नाही, तर तुम्ही त्यातून अनेक स्टायलिश पोशाख बनवू शकता. लग्नापासून ते सणांपर्यंत सर्वांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जास्त मेहनत न करता तुम्ही या आउटफिट्ससह वेगळा लुक मिळवू शकता. येथे त्याचे काही उत्तम पर्याय आहेत.
लग्नापासून ते सणांपर्यंत सर्वोत्तम पर्याय
जुन्या साड्यांपासून तुम्ही विविध फॅशन आणि स्टाईलचे कपडे परिधान करू शकता. लग्नापासून ते सणांपर्यंत परिधान करण्यासाठी हे सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय आहेत, साड्यांशिवाय कुर्ता आणि दुपट्ट्यातही हे फॅब्रिक छान दिसते. तुमच्या घरात कोणतेही फंक्शन किंवा लग्न असेल तर तुम्ही बनारसी फॅब्रिक इतर अनेक प्रकारे कॅरी करू शकता. तुमच्या आईच्या जुन्या साडीपासून तुम्ही अनेक प्रकारचे स्टायलिश आउटफिट्स तयार करू शकता. जे खूप क्लासी आणि सुंदर दिसते.
जंपसूट
जर एखाद्या मित्राच्या लग्नाचे फंक्शन असेल, जिथे तुम्हाला साडी, सूट किंवा लेहेंगा घालायचा नसेल, तर तुम्ही बनारसी साडीचा जंपसूट कॅरी करू शकता. जे नक्कीच पूर्णपणे वेगळे दिसेल.
पँट सूट
जंपसूटपेक्षा पँट सूट हा अधिक स्टायलिश आणि आरामदायी पर्याय आहे. यामुळे तुम्हाला खूप वेगळा लुकही मिळेल. तुम्ही संगीत रात्री अशा पँट सूट घालू शकता.
कुर्ता
बनारसी साडीतूनही कुर्ता बनवू शकता. तुम्ही याला पलाझो आणि लेगिंग्जसह एकत्र करू शकता आणि कोणत्याही छोट्या कार्यासाठी तयार होऊ शकता. हळदी, मेहंदी समारंभ यांसारख्या फंक्शन्ससाठी हा पर्याय खूप चांगला आहे.
स्कर्ट
जर तुम्हाला लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात काही पारंपारिक परिधान करायचे असेल, ज्यामध्ये तुम्ही सुंदरही दिसू शकता, तर तुम्ही शॉर्ट कुर्तीसोबत बनारसी फ्लेर्ड स्कर्ट एकत्र करू शकता. जे तुम्हाला पूर्णपणे युनिक लुक देईल.
दुपट्टा
आईच्या जुन्या बनारसी साडीतूनही तुम्ही सुंदर दुपट्टा बनवू शकता. साध्या सूटसोबत बनारसी दुपट्ट्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसेल.
पलाझो
कुर्त्यासोबत घालण्यासाठी बनारसी साडीपासूनही पलाझो बनवता येतो.
ड्रेस
तुम्ही पाच मीटरच्या साडीपासून सुंदर फ्लेर्ड ड्रेसही बनवू शकता. जे अनेक प्रसंगी परिधान केले जाऊ शकते. दिवस असो वा रात्री, प्रत्येक प्रसंगासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
हेही वाचा>>>
Fashion : फॅमिली पिकनिकला चाललात? 'हे' लेटेस्ट को-ऑर्ड सेट दिसतील Best! फोटो येतील छान, वाटेल आरामदायी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )