Fashion : अभिनेत्री साडीत इतक्या Perfect कशा दिसतात? सोनम कपूरचे 'हे' साडी लुक एकदा ट्राय करा अन् कमाल बघा
Fashion : स्टायलिश आणि परफेक्ट दिसण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटींचे लुक रिक्रिएट करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या शरीराच्या योग्य साईझची विशेष काळजी घेतली पाहिजे.
![Fashion : अभिनेत्री साडीत इतक्या Perfect कशा दिसतात? सोनम कपूरचे 'हे' साडी लुक एकदा ट्राय करा अन् कमाल बघा Fashion lifestyle marathi news How do actresses look so perfect in sarees Try Sonam Kapoors saree look once Fashion : अभिनेत्री साडीत इतक्या Perfect कशा दिसतात? सोनम कपूरचे 'हे' साडी लुक एकदा ट्राय करा अन् कमाल बघा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/6fe5a7866f13b66a5b5ed3299c071d491717902482769381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fashion : अनेक महिलांना प्रश्न पडतो की, अभिनेत्री साडीत इतक्या स्टायलिश आणि Perfect कशा दिसतात? त्यांची साडी, ज्वेलरी सगळं कसं अगदी परफेक्ट असते. असं त्यांचं सीक्रेट काय आहे? आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री सोनम कपूरचे साडी लुकबद्दल सांगणार आहोत, तसं पाहायला गेलं तर सोनम कपूर ही फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत अनेकदा चर्चेत असते. म्हणून तिला बॉलीवूडची फॅशन Diva असं म्हणतात. जाणून घेऊया तिच्या काही खास लूक्स बद्दल..
साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी सोप्या टिप्स
आजकाल अनेकजण सेलिब्रिटींचे स्टायलिश लूक रिक्रिएट करतो. याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांना स्टायलिश दिसणे आवडते. पारंपारिक लूकबद्दल बोलायचे झाल्यास, अनेकांना बऱ्याचदा सेलिब्रिटींचे साडी लुक स्वतःच्या स्टाईलमध्ये रिक्रिएट करायला आवडते. साडी नेसण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र सोनम कपूरचा साडीतील लूक खूप पसंत केला जात आहे. चला तर मग पाहूया अभिनेत्री सोनम कपूरचा स्टायलिश साडीचा लुक. तसेच, साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी सोप्या टिप्सही जाणून घ्या
जॅकेट स्टाईल साडी लुक
साडीमध्ये रॉयल लुक मिळवण्यासाठी तुम्ही लांब जॅकेट साडीसोबत घालू शकता. डिझायनर रोहित बल यांनी ही जॅकेट स्टाईल साडी डिझाइन केली आहे. या प्रकारची साडी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये तुम्हाला 2,000 रुपयांना मिळेल. गळ्यात चोकर आणि स्लीक हेअरस्टाइलसह हा लूक खुलून दिसेल
![Fashion : अभिनेत्री साडीत इतक्या Perfect कशा दिसतात? सोनम कपूरचे 'हे' साडी लुक एकदा ट्राय करा अन् कमाल बघा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/19c9fc017aff5994b4c42b76c2a5f9e51717902421215381_original.jpg)
टॉपसह साडी लुक
ऑफिस लूक मिळवण्यासाठी तुम्ही या प्रकारची प्रिंटेड किंवा प्लेन कॉटन साडी घालू शकता. या प्रकारची साडी तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंत बाजारात सहज मिळू शकते. ही साडी तुम्ही पेप्लम टॉप किंवा कोणत्याही राउंड नेक टॉपसोबत घालू शकता. या प्रकारच्या लुकमध्ये सिल्व्हर दागिने स्टाइल करू शकता.
View this post on Instagram
घरचोला साडी डिझाइन
ही सोनमच्या आईची जुनी साडी आहे. या प्रकारच्या लुकमध्ये तुम्हाला लाल रंगाच्या अतिशय गडद आणि हलक्या शेड्स पाहायला मिळतील. या प्रकारच्या लुकमध्ये ब्लाउजसाठी स्लीव्हलेस स्ट्रॅप डिझाइन स्टाईल करण्याचा प्रयत्न करा. या प्रकारच्या साडीमध्ये बन हेअरस्टाइल बनवा आणि गजरा लावा.
हेही वाचा>>>
Vat Purnima 2024 : यंदाची वटपौर्णिमा खास! पूजेला 'या' साड्या नेसाल, तर पती होईल खूश; महिला मंडळींकडून होईल कौतुक
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)