(Source: Poll of Polls)
Fashion : 'मी मिरवणार...'लेकाच्या लग्नात वरमाई नीता अंबानीचा उत्साह, गुलाबी रॉयल साड्यांचे कलेक्शन पाहून प्रेमात पडाल..
Fashion : घरातील फंक्शन्स असो किंवा इतर कार्यक्रम, नीता अंबानी यांचा साडीचा लूक असा असतो की, प्रत्येकजण त्यांच्याकडे बघत राहतो. सौंदर्यासोबतच त्यांच्या प्रत्येक लूकमध्ये रॉयल्टी दिसून येते.
Fashion : लेकाच्या लग्नात वरमाईचा उत्साह काही वेगळाच असतो, घरी सून येणार, पाहुणे मंडळींचा गोतावळा जमा होणार म्हणून ती लग्नाच्या सर्व तयारीकडे आवर्जून लक्ष देते. लेकाच्या लग्नात विविध साड्या घालून अवघ्या कार्यक्रमात मिरविणारी ती वरमाईच..! असंच काहीसं दृश्य अंबानीच्या घरात गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. आज त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही विवाहबद्ध होत आहेत. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आपल्या सौंदर्य आणि साध्या लूकने लोकांना आकर्षित करत आहेत. त्यांच्या घरातील फंक्शन्सपासून ते बाहेरच्या कार्यक्रमांपर्यंत नीता अंबानी या बहुतेक साडी नेसलेल्या दिसतात. नीता यांचा साडीचा लूक असा असतो की, प्रत्येकजण त्यांच्याकडे बघत राहतो. सौंदर्यासोबतच त्यांच्या प्रत्येक लूकमध्ये रॉयल्टी दिसून येते.
नीता अंबानींना साडी अत्यंत प्रिय!
नीता अंबानींना साडी किती आवडते हे त्यांचे लूक पाहूनच कळू शकते. नीता अंबानी अनेकदा इव्हेंटमध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान करताना दिसतात. गुलाबी रंगाची साडीही त्यांना चांगली शोभते. जर गुलाबी रंग तुम्हालाही शोभतो, तर तुम्ही नीता अंबानीच्या लूकवरून टिप्स घेऊन खरेदी करू शकता. त्यांच्या साड्या विवाहसोहळ्यासाठी किंवा कार्यालयीन पोशाखांसाठी योग्य पर्याय आहेत.
हेवी पदरासह गुलाबी साडी
अलीकडेच नीता अंबानी बाबा विश्वनाथ यांना मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी बनारसला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी सुंदर सिल्क फॅब्रिकमध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. एका तेजस्वी गुलाबी कापडावर सोन्याच्या तारांनी बूट्टी बनवल्या होत्या आणि साडीला सुंदर बनविण्यासाठी फुले, पाने आणि वेलींचे आकार कोरले गेले. यामुळे त्यांची साडी खूप सुंदर आणि रॉयल दिसत होती.
ब्रोकेड साडी
हेवी बॉर्डर साडी हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहे. नीता अंबानींच्या या साडीचा मुख्य रंग गुलाबी असला तरी बॉर्डरवर लाल आणि निळ्या रंगांनी सुंदर काम करण्यात आले आहे. बॉर्डरमुळे त्यांचा लूक इतर साड्यांपेक्षा खूपच वेगळा दिसतो.
सिल्क गुलाबी साडी
नीता अंबानींची ही गुलाबी साडी बनवायला 40 दिवस लागले. गुलाबी साडीवर चकचकीत जरी वर्क खूप सुंदर दिसत होते. यासोबत त्यांनी लॉंग नेकपीस आणि हेवी कानातले कॅरी केले होते. तर कपाळावरची बिंदी त्यांच्या सौंदर्यात भर घालत होती.
ब्लश गुलाबी साडी
नीता अंबानींची ही सुंदर गुलाबी साडी बनवण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर करण्यात आला नाही. ही सुंदर साडी मास्टर आर्टिस्ट श्री इकबाल अहमद यांनी स्वतःच्या हाताने बनवली आहे. फिकट गुलाबी रंगाच्या या साडीत नीता अंबानी खूपच सुंदर दिसत आहेत. यासोबतच त्यांनी केसांमध्ये एक लूज बन बनवला आहे.
मलबरी सिल्क गुलाबी साडी
तुतीच्या सिल्कने बनवलेली ही सुंदर गुलाबी साडी नीता अंबानींना छान दिसत आहे. या साडीचे जड काम तिला अधिक खास बनवत आहे. गळ्यात बांगड्या, अंगठ्या आणि नेकलेस घालून त्यांनी साडीचा लुक पूर्ण केला आहे.
हेही वाचा>>>
Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )