Fashion : 7 महिन्यांची गरोदर.. दिसली लाखात एक! अनंत-राधिकाच्या लग्नात दीपीकाचा 'तो' ड्रेस पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या! किंमत वाचाल तर...
Fashion : दीपिका पादुकोण तिच्या 7 व्या महिन्यात 'असा' काही पोशाख घालून पोहोचली, तिच्या या पेहरावाने चाहत्यांची मनं जिंकली
Fashion : देशात काय..अवघ्या जगात ज्या शाही लग्नाची चर्चा सुरू आहे, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा मुंबईत काल थाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला जगभरातील प्रसिद्ध दिग्गजींनी हजेरी लावली होती. या सर्व पाहुणे मंडळींमध्ये 7 महिन्यांची गरोदर दीपीका पादुकोण देखील पोहचली, यावेळी तिने जो ड्रेस परिधान केला होता. त्याकडे पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दीपीकाची स्टाईल पाहताच सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. जाणून घ्या.. असा कोणता ड्रेस दीपीकाने घातला होता, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. जाणून घ्या त्याची खासियत...
दीपिकाचा हा अवतार पाहून तिचे चाहते झाले घायाळ
मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी स्टार दीपिका पादुकोण बनली. कारण तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले. अनंत अंबानींच्या लग्नात दीपिका पदुकोण लाल रंगाच्या ड्रेसमध्ये शाही दिसत होती. तिने सुंदर लाल रंगाचा अनारकली ड्रेस घातला होती. तिचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले. तिच्या ड्रेससोबतच ॲक्सेसरीजही तिला रॉयल लुक देत आहेत. दीपिकाचा हा देसी अवतार पाहून तिचे चाहते घायाळ झाले.
View this post on Instagram
लाखोंचा ड्रेस घालून ती दिसली 'लाखात एक'!
तौरानीने डिझाइन केलेली सुंदर लाल अनारकली परिधान करून, दीपिका पदुकोणने रेड कार्पेटवर पोज दिली नाहीत परंतु चाहत्यांना तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या लुकची झलक दिली. तिच्या ड्रेसची किंमत सुमारे 145500 रुपये आहे. दीपीकाने तिच्या पारंपारिक पोशाखसोबत चोकर नेकलेस घातला होता, जो ऑनलाइन फॅशन समीक्षक डायटसब्याने डिझाइन केला होता. तसेच या नेकलेसचा महाराजा रणजीत सिंग यांच्या कुटुंबाशी ऐतिहासिक संबंध असल्याचे सांगितले.
दीपिकाच्या लूकने जिंकले मन
दीपिकाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सिंदूर आणि केसांचा बन केला होता. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला दीपीकाचा पती अभिनेता रणवीर सिंगनेही हजेरी लावली होती. दीपिकाला पाहून चाहत्यांनीही छान कमेंट्स केल्या. एकाने लिहिले- भारतीयांचा अभिमान आहे. एक म्हणाला- भारतीय संस्कृती खूप सुंदर दाखवली आहे.
हेही वाचा>>>
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )