Drinking Water Benefits: पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अनेक त्रासांपासून होऊ शकतो बचाव
Drinking Water Benefits: जपानमधील लोक मुबलक प्रमाणात पाण्याचे सेवन करतात, ज्यामुळे ते निरोगी आणि स्लिम राहतात. तुम्हीही योग्य प्रकारे पाणी प्यायले तर अनेक आजारांपासून दूर राहाल.
Drinking Water Benefits: उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
नियमित पाणी पिण्याचे फायदे
1. आपण अनेक तास कामाच्या गडबडीत पाणी न पिता राहतो. उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
2. सकाळी उठून सर्वप्रथम पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. सकाळी पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल शांत होण्यास मदत होते आणि स्टोन बनत नाही.
3. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावली तर चयापचय आणि पचनक्रिया वाढते. त्यामुळे उठल्याबरोबर कमीत कमी दोन ग्लास पाणी प्यावे.
4. जर तुमची त्वचा निस्तेज होत असेल तर उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्यायले पाहिजे. पाण्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. यामुळे नवीन पेशी तयार होऊन त्वचा चमकदार बनते. सतत पाणी पिणे हे व्यक्तीला वारंवार आजारी पडण्याच्या समस्येपासून देखील वाचवू शकते.
5. नियमित योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायलाने भूक कमी लागते, त्यामुळे आवश्यक तेवढेच अन्न पोटात जाते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने लघवीसोबत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते.
6. ज्यांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो अशा लोकांसाठी पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. शरीरातील निर्जलीकरणामुळे थकवा जाणवतो. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे. यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते.
7. नियमित पाणी प्यायल्याने केसाचे सौंदर्य सुधारते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे केस खूप नाजूक होतात. केस कोरडे आणि निर्जीव होण्यामागे शरीरातील पाण्याची कमरता हे मुख्य कारण आहे. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसांची वाढ लवकर होते.
8. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी सुरु होते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल, तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवेल.त्यामुळे डोकेदुखी थांबवायची असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.
9. भरपूर पाणी पिण्याने मेंदू तजेलदार राहतो. पाणी पिण्याने लक्ष एका ठिकाणी केंद्रित करण्याची क्षमता वाढते. मनाची चंचलता शांत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रागावर नियंत्रण मिळवता येते.
10. झोपण्यापूर्वी काही मिनिटांआधी पाणी पिण्याने मूड चांगला राहतो आणि झोप पण चांगली लागते. पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे.
संबंधित बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )