एक्स्प्लोर

Diwali 2024 Recipe: दिवाळीचा गोडवा असेल प्रत्येकाच्या तोंडी, जिभेवर रेंगाळेल चव! 5 दिवसाच्या 5 मिठाई रेसिपी

Diwali 2024 Recipe: जर तुम्हीही दिवाळीच्या निमित्ताने घरीच मिठाई बनवण्याचा विचार करत असाल तर दिवाळीच्या पाच दिवसांसारखी मिठाई बनवू शकता. जाणून घेऊया सोपी रेसिपी-

Diwali 2024 Recipe: अवघ्या काही दिवसात दिवाळी येणार असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, कोणाच्या घरी साफसफाई, कोणाच्या घरी फराळाची तयारी, कोणाकडे सजावटीची तयारी... दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजच्या दिवशी संपतो. अशात आज या लेखात आम्ही तुम्हाला सणांच्या या पाच दिवसांसाठी 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईच्या रेसिपी सांगत आहोत, ज्या तुम्ही घरी सहज बनवू शकता...

वर्षातील सर्वात आनंदाचा काळ

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येत आहे. हा दिव्यांचा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. यंदाची दिवाळी 31 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. हा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे, जो लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. सणासुदीच्या काळात मिठाई नसेल असं एकही घर नाही. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाई नक्कीच दिली जाते. अशा वेळी जर तुम्हीही दिवाळीच्या निमित्ताने घरीच मिठाई बनवण्याचा विचार करत असाल तर दिवाळीच्या पाच दिवसांसारखी मिठाई बनवू शकता. जाणून घेऊया बनवण्याची सोपी रेसिपी

गुलाबजाम

साहित्य
1 कप खवा (मावा)
1/4 कप मैदा
1/4 टीस्पून बेकिंग पावडर
1 कप साखर
1 कप पाणी
1/4 टीस्पून वेलची पावडर
तळण्यासाठी तेल

सर्व प्रथम एका वाडग्यात खवा, मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मऊ पीठ मळून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे (साधारण 1 इंच) करा.
आता एका पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करा आणि साखर विरघळेपर्यंत उकळवा. वेलची पूड घालून बाजूला ठेवा.
एका खोलगट कढईत तेल गरम करून मंद आचेवर गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
तळून झाल्यावर साखरेच्या पाकात किमान 2 तास भिजवून मग सर्व्ह करा.

रसगुल्ला

साहित्य
1 लिटर फुल क्रीम दूध
1/4 कप लिंबाचा रस
1 कप साखर
4 कप पाणी
1/2 टीस्पून गुलाबजल (ऐच्छिक)

सर्वप्रथम दूध उकळून त्यात लिंबाचा रस टाकून छेना बनवा. नंतर ते गाळून थंड पाण्याखाली धुवा. अतिरिक्त पाणी पिळून काढा.
यानंतर, छेना गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्या आणि त्याचे लहान गोळे करा.
सिरप तयार करण्यासाठी साखर आणि पाणी उकळवा. हवे असल्यास त्यात गुलाबजलही टाका.
आता गोळे पाकात ठेवा आणि सुमारे 15 मिनिटे शिजवा. त्यांना पाकात थंड होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा.

बर्फी

साहित्य
1 कप किसलेले खोबरे किंवा खवा
1/2 कप साखर
1/4 कप दूध
1/2 टीस्पून वेलची पावडर
गार्निशसाठी चिरलेला ड्राय फ्रूट्स

बर्फी बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात खोबरे किंवा खवा, साखर आणि दूध एकत्र करून घट्ट होईपर्यंत शिजवा.
यानंतर त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा.
नंतर तयार मिश्रण एका तूपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओता आणि चांगले पसरवा आणि नंतर थंड होऊ द्या.
गार झाल्यावर चांगले सेट करून हव्या त्या आकारात कापून ड्रायफ्रूट्सने सजवा.

बेसन लाडू

साहित्य
1 कप बेसन
1/2 कप तूप
1/2 कप पिठीसाखर
1/4 टीस्पून वेलची पावडर
गार्निशसाठी चिरलेला ड्राय फ्रूट्स

लाडू बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करून त्यात बेसन सोनेरी आणि सुगंधी होईपर्यंत तळून घ्या.
आता ते आचेवरून उतरवा आणि थोडे थंड होऊ द्या. नंतर त्यात साखर आणि वेलची पूड घाला.
लाडू बनवण्याइतपत थंड झाल्यावर त्याचे लहान लाडू करा.
शेवटी चिरलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवा.

काजू कतली

साहित्य
1कप काजू
1/2 कप साखर
1/4 कप पाणी
1/2 टीस्पून वेलची पावडर
चांदीचे फॉइल (पर्यायी)

सर्वप्रथम काजू बारीक वाटून त्याची पावडर बनवा.
नंतर एका कढईत साखर आणि पाणी एकत्र करून पाक बनवा.
आता या पाकात काजू पावडर, वेलची, पीठ तयार होईपर्यंत सतत ढवळत राहा.
यानंतर, हे मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटवर पसरवा आणि ते सपाट करा.
यानंतर, शेवटी, चांदीच्या वरकने सजवा आणि चौकोनी आकारात कापून घ्या.

हेही वाचा>>>

Health: 'ऑनलाइन फूड ऑर्डर केलंय? सावधान..' कंटेनर्समधून कॅन्सरचा धोका? संशोधनातून माहिती समोर, नेमकं सत्य काय?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde :  टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखतABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget