Health Tips : पावसाळ्यात तोंडाची स्वच्छता का महत्त्वाची आहे? आजच 'या' खास पद्धतींचा वापर करा
Monsoon Health Tips : पावसाळ्यात दातांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचे आहे. या ऋतूत लोक आहाराबाबत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
![Health Tips : पावसाळ्यात तोंडाची स्वच्छता का महत्त्वाची आहे? आजच 'या' खास पद्धतींचा वापर करा dental-health-take-a-look-at-different-ways-of-cleaning-your-mouth marathi news Health Tips : पावसाळ्यात तोंडाची स्वच्छता का महत्त्वाची आहे? आजच 'या' खास पद्धतींचा वापर करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/06/34a0154e809d3005a0ef1f14c5b4a1a01691312001419358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Monsoon Health Tips : पावसाळ्यात दातांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या ऋतूत लोक आहाराबाबत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे जिवाणूंचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. स्वच्छ पाण्याची काळजी न घेतल्यास तोंडाचे आरोग्य बिघडू शकते आणि काही समस्यांचा त्रास आपल्याला होऊ शकतो. या ऋतूत निष्काळजीपणामुळे दातांमध्ये पोकळी, हिरड्या सुजणे, दात दुखणे यांसारख्या समस्या वारंवार उद्भवतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात दातांची विशेष काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात.
कोरड्या टूथब्रशने दात स्वच्छ करा
पावसाळ्यातील ओलाव्यामुळे सर्वत्र बॅक्टेरिया वाढू लागतात. टूथब्रशमध्येही बॅक्टेरिया वाढू लागतात. अशावेळी पावसात टूथब्रश स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. टूथब्रश वॉशरूममध्ये ठेवू नका. टूथब्रश वापरल्यानंतर तो उन्हात ठेवा म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. सूर्यप्रकाश टूथब्रशवर पडल्यास बॅक्टेरिया बर्याच प्रमाणात कमी होतात.
टूथब्रश वेळोवेळी बदला
दातांच्या आरोग्यासाठी वेळोवेळी टूथब्रश बदलणे अत्यंत आवश्यक आहे. सीझनमध्ये एकदा तरी ब्रश बदलला पाहिजे. अशा वेळी दर 2-3 महिन्यांनी टूथब्रश बदलावा. आपल्या दातांप्रमाणेच टूथब्रशमध्येही बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. ऋतू बदलताच तुम्ही तुमचा टूथब्रश बदलणं गरजेचं आहे.
हंगामी फळं आणि भाज्यांचं सेवन करा
आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा. पावसाळ्यात स्ट्रॉबेरी, दुधी, काकडी, सफरचंद यांसारखी फळे आणि भाज्या खा. या ऋतूत अधिकाधिक गोड पदार्थ खाणं टाळा. मका, शिजवलेले अन्न किंवा सूपचं सेवन करा.
पावसाळ्यात जास्त गरम चहा-कॉफी पिऊ नये
पावसाळ्यात वातावरणात एक प्रकारचा थंडावा असतो. अशा परिस्थितीत लोक खूप गरम चहा आणि कॉफी पिण्यास सुरुवात करतात. पण, जर तुम्हीही असे काही करत असाल तर तुम्ही वेळीच ही सवय टाळणं गरजेचं आहे. उष्ण वातावरणात चहा-कॉफी प्यायल्याने दातांची पोकळी वाढते. कॉफी आणि चहामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते, त्यामुळे अशी पेय पावसाळ्यात पिणे टाळावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)