Cycling : काही वेळाचं सायकलिंग अन् कित्येक फायदे
Cycling benefits : सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे किमान 4 मिनिटं सायकल चालवणंही शरीराला फायदेशीर ठरतं.
cycling : सायकलिंग करणं आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे किमान 4 मिनिटं सायकल चालवणंही शरीराला फायदेशीर ठरतं. वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होतात, त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठीही सायकल चालवणं फायद्याचं ठरतं. एका संशोधनातून हे समोर आले आहे. सायकलिंग त्या सेल्सना रोखून ठेवतो, ज्यांमुळे वाढतं वय चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवत नाही.
संशोधकांच्या माहितीनुसार, अनेकजणांचा असा समज असतो की लाँग बाईक राईड म्हणजेच जास्तीत जास्त अंतर सायकल चालवल्यास चांगला व्यायाम होतो. मात्र, अमेरिकेतील एका संशोधनातील माहितीनुसार, एका आठवड्यात 12 वेळा केवळ 4 मिनिटं सायकलिंग करणं म्हणजे ट्रेडमिलवर 90 मिनिटांपर्यंत वॉक करण्यासारखं आहे.
संशोधक 4 मिनिट सायकलिंगबाबत काय सांगतात?
संशोधकांच्या माहितीनुसार, शॉर्ट बर्स्ट एक्सरसाईजमुळे शरीर तंदुरुस्त होतं. लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आणि डायबीटिजपासून दूर राहण्यासही सायकलिंगची मदत होते.
संशोधन कसं केलं?
18 ते 30 वयोगट आणि 65 ते 80 वयोगटातील 72 महिला आणि पुरुषांचा समावेश या संशोधनादरम्यान सर्वेक्षणात करण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींकडून हाय-इंटेसिटी ट्रेनिंगपासून वेट ट्रेनिंग, कंबाईन ट्रेनिंगसारख्या गोष्टी करवून घेतल्या.
संशोधनातून काय पुढे आलं?
वाढत्या वयाची चिन्हं चेहरा किंवा शरीरावर प्रकर्षाने जाणवतात. त्यापासून बचाव करण्यासाठी 4 मिनिटांची सायकलिंग फायदेशीर आहे. विशेष म्हणजे इतर औषधांपेक्षा सायकलिंग हा उपाय फलदायी आहे. ज्यांना वर्कआऊटसाठी फारसा वेळ मिळत नाही, अशांसाठी सायकलिंगचा पर्याय उत्तम मानला जातो आहे. हे संशोधन एका जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :