(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cities In India : भारतातील 'ही' शहरे ओळखली जातात रंगांवरून कोणती आहेत शहरे, घ्या जाणून
विविधतेने भरलेल्या भारतात तुम्हाला अशी अनेक शहरे पाहायला मिळतील, जी रंगांच्या नावाने ओळखली जातात. कोणत्या शहरांना पिंक, ब्लू, आणि व्हाईट म्हणतात ते जाणून घेऊया.
Cities In India Known By Colours : भारतात एकूण 28 राज्ये आहेत. या प्रत्येक राज्यांची एक वेगळी प्रथा आणि वारसा आहे. ज्यामुळे ही राज्ये त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखले जातात. या राज्यांमधील खाद्यपदार्थ आणि संस्कृतीमुळे या ठिकाणांची भारतात एक वेगळी ओळख आहे. तथापि, या सर्वांव्यतिरिक्त, या शहरांशी संबंधित रंग आहेत, जे त्यांना संपूर्ण जगात एक विशेष ओळख निर्माण करून देतात. देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील पिंक सिटीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण, तुम्हाला माहिती आहे का की राजस्थानमध्ये अशी अनेक शहरे आहेत, जी रंगांवरून ओळखली जातात. जाणून घेऊया या काही विशेष शहरांबद्दल.
पिंक सिटी
भारतातील हे शहर जगभर ओळखले जाते. हे शहर गुलाबी रंगाचे आहे, जे राजस्थानचे जयपूर शहर आहे. 1876 मध्ये प्रिन्स अल्बर्टला जयपूर शहराला भेट द्यायची होती. यानंतर जयपूरचे तत्कालीन शासक महाराजा सवाई राम सिंह द्वितीय यांनी त्यांच्या आदरातिथ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला. यानंतर शहराला गुलाबी रंगाने रंगविण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या प्रथेमुळे शहराला पिंक सिटी असे नाव मिळाले.
ब्लू सिटी
जोधपूर हे भारतातील राजस्थान राज्यातील एक शहर आहे ज्याला ब्लू सिटी म्हणूनही ओळखले जाते. तसे, जोधपूरला सन सिटी देखील म्हणतात. दुसरीकडे मेहरानगडवरून पाहिल्यास हे शहर निळ्या रंगात रंगलेले दिसते.
व्हाईट सिटी
राजस्थानमध्ये तुम्हाला व्हाइट सिटी नावाचे एक शहर देखील दिसेल, ते उदयपूर आहे. हे शहर 1559 मध्ये महाराणा प्रताप यांचे वडील महाराणा उदय सिंह यांनी वसवले होते. शहरात बांधलेल्या सुंदर तलावांमुळे हे शहर पूर्वेचे व्हेनिस म्हणूनही ओळखले जाते. या शहरात संगमरवरी दगडाने बनलेले अनेक राजवाडे आहेत. यामुळेच या शहराला भारतात व्हाईट सिटी म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. संगमरवरी दगडाने बनवलेल्या अनेक अद्वितीय वास्तू याठिकाणी आहेत आणि म्हणूनच या शहराला पांढरे शहर असे नाव देण्यात आले आहे.
गोल्डन सिटी
राजस्थानच्या थार वाळवंटात वसलेले जैसलमेर शहर त्याच्या वाळवंट सफारी आणि भव्य किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला पिवळ्या वाळूच्या दगडाने बनलेला असून या किल्ल्यावर संध्याकाळचा प्रकाश पडला की त्याला सोनेरी रंग येतो. त्यामुळे याला सोनार किल्ला असेही म्हणतात. यासोबतच इथे इतर प्राचीन वास्तूही या पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेल्या आहेत. त्यामुळे याला गोल्डन सिटी असे नाव देण्यात आले आहे.