Winter Health Tips : हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे फायदेशीर; दिवसाला किती, कधी आणि कसे खावे? वाचा संपूर्ण माहिती
Winter Health Tips : हिवाळ्यात चवनप्राश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात, जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
Winter Health Tips : हिवाळा (Winter Season) आला की घरातील प्रत्येकजण च्यवनप्राश (Chyawanprash) खाण्याचा सल्ला दिला जातो. लहानपणापासून मुलं आपल्या आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून च्यवनप्राश खाण्याचे फायदे किती या गोष्टी ऐकत असतात. खरंतर, च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती असतात. ज्या आपल्या शरीराला उबदार करण्याचे काम करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. ज्यामुळे शरीराला विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते. लहान मुलांची शक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश दिले जायचे. तसेच, बुद्धीसाठीही च्यवनप्राशचा वापर केला जायचा. पण, तुम्हाला च्यवनप्राश खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? च्यवनप्राश केव्हा आणि कसे खावे हे तुम्हाला माहित आहे का? याच संदर्भात अधिक माहिती या माध्यमातून जाणून घेऊयात.
किती आणि केव्हा घ्यावे?
च्यवनप्राश पुरेशा प्रमाणात खावे. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला पोट फुगणे, जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. एक प्रौढ व्यक्ती दररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा च्यवनप्राश कोमट पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकतो. जर तुम्ही मुलांना च्यवनप्राश देत असाल तर त्यांना सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा च्यवनप्राश द्यावा.
'या' पदार्थांसोबत सेवन करू नका
तुमच्या कुटुंबात दम्याचे किंवा श्वासाचे रुग्ण असतील तर त्यांनी च्यवनप्राश दुधाबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ नये. ज्यांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणायची असेल तर तुम्ही दररोज 3 ग्रॅम च्यवनप्राशचे सेवन करू शकता.
च्यवनप्राश खाण्याचे फायदे काय आहेत?
चवनप्राश शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते, ज्यामुळे थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण होते. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे आपले आरोग्य चांगले ठेवण्यास आपल्याला मदत करतात.
च्यवनप्राशच्या सेवनाने प्रजनन क्षमताही वाढते. हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे.
जर तुम्ही एका आठवड्यासाठी काही प्रमाणात च्यवनप्राशचे सेवन केले तर तुम्हाला काही दिवसांत त्याचा फरक जाणवू लागले. जर तुम्ही याहून अधिक काळ जर हे चक्र सुरु ठेवलं तर तुम्हाला आणखी फायदे मिळू शकतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय