Child Health : पेराल तसं उगवतंय हो! पालकांच्या 'या' सवयी मुलांना हुशार बनवतात, जीवनात मिळवतात यश, प्रत्येक पाऊल पुढे राहतात.
Child Health : प्रत्येक पालकाला आपले मूल खूप हुशार असावे असे वाटते. पण यासाठी पालकांनी त्यांच्या संगोपनाच्या वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Child Health : असं म्हणतात ना, तुम्ही पेराल तसं उगवेल, पालकांनो (Parenting Tips), ही म्हण तुमच्या मुलांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. कारण प्रत्येक पालकाचे पालकत्व वेगवेगळे असते, हा प्रवास काही सोप्पा नसतो बरं का! म्हणजे मुलाचे संगोपन करता करता त्यात प्रेम, आपुलकी, हसणं, आनंद आणि शिकण्याने भरलेला प्रवास आहे. सर्व पालक आपल्या मुलांच्या सर्व संभाव्य गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तसेच आपल्या मुलांना दिलासाही देतात. प्रत्येक पालकाला आपले मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी, बुद्धिमान असावे असे वाटते. मात्र, जेव्हा मेंदूच्या विकासाचा विचार केला जातो, तेव्हा पालक त्यांच्या मुलांशी ज्या प्रकारे संवाद साधतात, त्याचा मुलाच्या मानसिक आणि भावनिक विकासावरमहत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. म्हणजेच पालकांच्या पालकांच्या वृत्तीचा आणि संगोपनाचा मुलाच्या मेंदूच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो. येथे आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत. ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा निरोगी विकास होतो. तसेच त्यांना हुशार बनविण्यात देखील मदत करते.
मुलांसमोर हळू बोला, प्रेम व्यक्त करा
सर्वात प्रभावी सकारात्मक पालक तंत्रांपैकी एक म्हणजे तुमच्या मुलांशी बोलताना नेहमी सौम्य स्वर वापरणे. त्यांच्यासमोर आरडाओरडा करणे किंवा चूक झाल्यास त्यांना दोष देणे टाळावे. त्यांच्याशी संवाद साधताना शांत आणि सौम्य वृत्तीचा अवलंब करा, जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आश्चर्यकारक प्रभाव पडतो. जेव्हा पालक हळूवारपणे बोलतात. तेव्हा ते त्यांच्या मुलासाठी एक सुरक्षित आणि निरोगी वातावरण तयार करतात. जिथे मुलं कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता स्वतःला व्यक्त करतात. यामुळे पालक-मुलाचे बंध मजबूत होतात, जे निरोगी मेंदूच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
मुलांच्या चांगल्या गुणांना वाव द्या!
प्रत्येक मुलामध्ये विविध कलागुण, आवड आणि व्यक्तिमत्व असते. पालक या नात्याने, तुम्ही अनेकदा तुमच्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू लागता, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टाळावी लागेल. त्याऐवजी, तुम्हाला तुमच्या मुलाची ताकद समजून घ्यावी लागेल आणि त्याच्यावर काम करावे लागेल. तुम्ही त्याच्या गुणांवर आनंदी राहावे आणि त्यांची स्तुती करावी. तुम्ही केलेली तुलना तुमच्या मुलांच्या मनात राग निर्माण करू शकते. स्वाभिमान कमी करू शकते, निरोगी मेंदूच्या विकासात अडथळा आणू शकते
मुलांच्या चुका मान्य करा, रागावू नका
कोणीही परफेक्ट नसतो, तुमच्याही मुलांचे संगोपन करताना, तुमचं मूल नवीन काही शिकताना त्यांच्याकडून अनेक चुका होतील आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक या नात्याने, तुमच्या मुलांची प्रत्येक हालचाल सतत त्यांच्याशी संवाद साधून दुरुस्त केल्याने त्यांना त्यांच्या अनुभवातून शिकण्याची आणि त्यांची विचारसरणी विकसित करण्याची संधी मिळते. यात मुलांच्या भावनेला प्रोत्साहन देणे, जिथे तुम्ही आव्हानांना अडथळ्यांऐवजी वाढीच्या संधी म्हणून पाहू शकता, ज्यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनात एक चांगले व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करते.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Child Health : तू चाल पुढं...! मुलांना भावनिकदृष्ट्या 'असे' मजबूत करा की, त्यांना आयुष्यात कधीही कसलीच भीती वाटणार नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )