Camphor : पूजेच्या साहित्यात वापरला जाणारा कापूर नेमका कशापासून तयार केला जातो? वाचा कापूर बनविण्याची योग्य पद्धत
Camphor Making Process : पूजेच्या साहित्यात कापूरला विशेष महत्त्व आहे. मात्र, कापूरतची निर्मिती कशी केली जाते हे तुम्हाला माहित आहे का?
Camphor Making Process : हिंदू धर्माला मानणारे लोक जेव्हा पूजा करतात त्या वेळी पूजेच्या साहित्यात सर्वात महत्वाची वस्तू असते ती म्हणजे कापूर (Camphor). धार्मिक मान्यतेनुसार, कापूरला पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. पूजा करणारी प्रत्येक व्यक्ती कापूरचा उपयोग करते. पूजेच्या साहित्यात कापूर का वापरला जातो, त्याचे महत्त्व नेमके काय या संदर्भात तुम्ही आजवर बरीच माहिती वाचली असेल, ऐकली असेल. मात्र, कापूर कशा प्रकारे तयार केला जातो (Camphor Making Process). त्याचा सुगंध इतर सुगंधांपेक्षा वेगळा आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा खूप फायदेशीर आहे. या ठिकाणी कापूर बनवण्यासाठी कोणत्या झाडाचा वापर केला जातो ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कापूर बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
कापूर हा खऱ्या अर्थाने झाडांपासून तयार केला जातो. मात्र, बाजारात कापूरची मागणी जास्त असल्याने त्याचे उत्पादन कारखान्यात किंवा लॅबमध्ये केले जाते. कापूर ज्या झाडापासून तयार केला जातो त्याला कापूर वृक्ष (Camphor Tree) असे म्हणतात. तसे, या झाडाचे नाव Cinnamomum camphora आहे. कापूर झाडाच्या साल किंवा पानांमधून बनविला जातो. अनेक प्रकारचे कापूर बनवले जातात आणि प्रत्येक कापूर वेगळा असतो कारण तो वेगळ्या झाडापासून तयार केला जातो.
झाडांपासून कापूर कसा तयार केला जातो?
कापूर झाडांच्या सालापासून बनवले जाते. यामध्ये या लाकडाच्या सालीला गरम करून वाफेद्वारे पावडर बनवली जाते आणि त्या पावडरमधूनच खरा कापूर बनवला जातो. मात्र, आता काही ठिकाणी कृत्रिमरीत्या कापूर बनवला जातो. हे झाड आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि चीन, जपानसह तैवानमध्ये याची निर्मिती जास्त केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांपासून वेगवेगळ्या प्रकारचे कापूर बनवले जातात.
कृत्रिमरित्या कापूर कसा बनवला जातो?
जर तुम्हाला कृत्रिमरित्या कापूर बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला झाडाची आवश्यकता नसते. असे कापूर केमिकलद्वारे तयार केले जातात. यासाठी टर्पेन्टाइन तेल वापरले जाते. याद्वारे ते काही रासायनिक प्रक्रियेद्वारे बनवले जाते. कापूरचे रासायनिक सूत्र C10H16O आहे आणि ते पॉलिव्हिनाईल क्लोराईड, सेल्युलोज नायट्रेट इत्यादीपासून बनविलेले आहे. मात्र, कापूर बनवण्याची योग्य पद्धत म्हणजे कापूरच्या झाडापासून त्याची निर्मिती करणे. त्यामुळे जितक्या नैसर्गिक पद्धतीने कापूर तयार केला जातो. तितकाच तो चांगला असतो.