Budh Pujan 2022 : श्रावणातील बुधवार म्हणजेच बुधपूजनाचा दिवस; जाणून घ्या काय आहे या दिनाची कथा
Budh Pujan 2022 : श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते.
Budh pujan 2022 : श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. ह्या व्रताची कथा अशी- एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी सहा सुना ‘आम्ही कामात आहोत त्यामुळे आमचे हात रिकामे नाहीत’ – असे सांगून त्यांना घालवून देत असत. काही काळ गेल्यानंतर त्या राजाचे राज्य गेले. परिणामी बघता बघता ऐश्वर्य जाऊन दारिद्र्य आले. त्यांच्यापैकी सर्वात लहान सुनेने त्या मामा-भाच्यांची योग्यता जाणली होती. तिने ह्या मामा-भाच्यांची सर्व कुटुंबीयांच्यावतीने क्षमा मागितली. पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत, म्हणून उपाय विचारला. त्यावेळी त्यांनी हे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले.
ह्याच व्रतकाळात परराज्यात गेलेल्या तिच्या पतीच्या गळ्यात त्या देशीच्या हत्तीने अचानक फुलमाला घातली. त्यामुळे त्या राज्याच्या प्रजेने त्याला आपला राजा केले. काही काळानंतर ह्मा सात सुना आणि त्यांचे पती कामधंदा शोधत हिंडत ह्या नव्या राज्यात आले धाकट्याने आपल्या पत्नीला, मुलांना आणि भावंडांना ओळखले. मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले. धनसंपत्ती आणि बुद्धिमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते.
सद्यःस्थिती :
धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती ह्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल त्यांनी ते करावे. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे. हाही एकप्रकारे धार्मिक शिक्षकदिनच म्हणावा लागेल.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Shravan 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- 21st August 2022 Important Events : 21 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना