एक्स्प्लोर

हिवाळ्यात पायांची अशी घ्या काळजी; 'हे' 4 होममेड फुट स्क्रब ठरतील फायदेशीर

Homemade Foot Scrub: भेगा पडलेल्या टाचांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी फूट स्क्रब बनवू शकता.

Homemade Foot Scrub: हिवाळा (Winter Care Tips) आला की, उकाड्यापासून सुटका मिळतेच. पण हिवाळा बऱ्याच आरोग्याच्या समस्यांसोबतच (Health Tips) त्वचेच्या समस्याही घेऊन येतो. हिवाळ्यात कोरड्या त्वचेची (Dry Skin Problems) समस्या उद्भवते. हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा, ओठ, हातापायांची त्वचा कोरडी होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी सर्रास बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो. पण त्याऐवजी घरच्या घरी तुम्ही कोरड्या त्वचेची समस्या दूर करु शकता. 

हिवाळ्यात पायांची स्किन ड्राय होणं, क्रॅक हिल्स यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. परंतु यांचा परिणाम काही वेळासाठीच दिसून येतो. काही वेळानंतर पुन्हा पाय तसेच दिसू लागतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेप्रमाणेच पायांनाही स्क्रबिंग करणं गरजेचं असतं. फुट स्क्रबमुळे पायांच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेचा ड्रायनेस निघून जातो. आज आम्ही तुम्हाला 4 होममेड फुट स्क्रबबाबत सांगणार आहोत. जे तुमच्या पायांची स्किन सॉफ्ट आणि मुलायम बनवण्यासाठी मदत करतील. 


हिवाळ्यात पायांची अशी घ्या काळजी; 'हे' 4 होममेड फुट स्क्रब ठरतील फायदेशीर

1. पायांच्या भेगांसाठी मिल्क स्क्रब

साहित्य :

  • 1 कप दूध 
  • 5 कप कोमट पाणी 
  • 4 टेबलस्पून साखर किंवा मीठ
  • 1/2 कप बेबी ऑइल 
  • प्युबिक स्टोन

कृती :

- एका टबमध्ये एक कप दूध, 5 कप कोमट पाणी घ्या. 
- आता या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी आपले पाय बुडवून ठेवा. 
- एका बाऊलमध्ये बेबी ऑईल आणि साखर किंवा मीठ एकत्र करा. 
- तयार पेस्ट पायांवर लावून स्क्रब करा. त्यानंतर प्युबिक स्टोनच्या सहाय्याने पायांवर मसाज करा. 
- स्क्रब केल्यानंतर पायांवर मॉयश्चरायझर किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करा. 


हिवाळ्यात पायांची अशी घ्या काळजी; 'हे' 4 होममेड फुट स्क्रब ठरतील फायदेशीर

2. रिफ्रेशिंग लेमन फुट स्क्रब 

साहित्य :

  • 2 कप साखर 
  • 1/4 खोबऱ्याचं तेल 
  • 6 ते 8 थेंब लेमन एसेंशियल ऑईल 

कृती :

- बाऊलमध्ये साखर, खोबऱ्याचं तेल आणि लेमन एसेंशियल ऑईल एकत्र करून घ्या. 
- त्यानंतर हे स्क्रब पायांवर लावा.
- आंघोळीपूर्वी हे स्क्रब करू शकता. 
- त्यामुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळण्यासोबतच डेड स्किन सेल्स निघून जाण्यास मदत होईल. 

3. पेपरमिंट फुट स्क्रब

साहित्य :

  • 2 चमचे पेपरमिंट ऑईल
  • 1 चमचा ब्राऊन शुगर 
  • 1 चमचा खोबऱ्याचं तेल 
  • 1 चमचा लिंबाचा रस 

कृती :

- एका जारमध्ये  ब्राऊन शुगर, खोबऱ्याचं तेल आणि पेपरमिंट ऑईल एकत्र करून स्क्रब तयार करा. 
- तयार मिश्रण आपल्या पायांच्या ड्राय स्किनवर लावून व्यवस्थित स्क्रबिंग करा.
- त्यानंतर मॉयश्चरायझर लावून पायांमध्ये मौजे घाला.
- स्क्रबमधील ब्राऊन शुगर पायांच्या ड्राय स्किनला एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करेल. 
- खोबऱ्याचं तेल स्किनला मॉयश्चराईझ करण्यासाठी फायदेशीर ठरेल. 
- पेपरमिंट एसेंशियल ऑईलमुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळतो.  

4. विनेगर फुट स्क्रब 

साहित्य :

  • गरम पाणी 
  • 2 टेबलस्पून व्हिनेगर 
  • मीठ

कृती :

- जर तुमच्या पायांना तुम्हाला थकवा जाणवत असेल तर त्यांना रिलॅक्स करण्यासाठी स्क्रब फायदेशीर ठरतं. 
- एका भांड्यामध्ये गरम पाणी टाकून त्यामध्ये व्हिनेगर आणि थोडं मीठ टाका. 
- आता या पाण्यामध्ये पाय 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवा.
- पाय सुकवून मॉयश्चरायझरचा लावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Health Benefits of Pani Puri : टेस्टी टेस्टी पाणीपुरी, असते हेल्दी; वेट लॉस, अॅसिडिटीसह अनेक समस्या होतील झटपट दूर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget