Beauty Product Expensive : ऐन सणवाराला महिलांना सजणं देखील झालं महाग, वाढत्या महागाईचा परिणाम!
Beauty Product Expensive : मागील काही दिवसांत महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतींमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Beauty Product Expensive : मागील काही दिवसांत महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतींमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये टिकली, काजळ, पावडर, फाउंडेशन, लिपस्टिक, नेल पॉलिश, स्किन केअर क्रीम, बॉडी लोशन यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. लग्न समारंभ आणि विविध सण, उत्सव साजरे होणाऱ्या या काळात सौंदर्य प्रसाधनांच्या वापरात वाढ होते. ऐन सणवाराच्या वेळी किंमतीत वाढ जाल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. वाढत्या महागाईचा परिणाम ज्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंवर दिसून येत आहे तसाच तो सौंदर्य प्रसाधनांच्या किमतींवर देखील दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यापासून लग्न सराई सुरू होत आहे. ज्यात महिलांना छान नटावंसं वाटतं. हौस पुरवावीशी वाटते. यावेळी बाजारात सौंदर्य प्रसाधनांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर आता गुढीपाडवा, गणगौर शोभायात्रा असल्याने यामध्ये महिलांची उपस्थिती मोठी असते. अशा वेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नटायला महिलांना खूप आवडतं. परंतु, आता हेच सजून जाणं महिलांना महागात पडणार आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे, कोविड संसर्गाच्या धोक्यापासून बचावा बरोबरच, संपूर्ण जगाची आर्थिक समीकरणे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहेत. आज पेट्रोलियमसह सर्व ग्राहक उत्पादनांवर महागाई वाढली आहे.
सौंदर्य प्रसाधनांचे दर :
सौंदर्य प्रसाधन | आधीचे दर | आताचे दर |
पॉन्ड्स पावडर | 310 | 340 (400 ग्रॅम) |
फाउंडेशन - Lakme | 150 | 160 |
लिपस्टिक | 350 | 400 |
फेअर & लवली | 101 | 110 |
हिमालया फेसवॉश | 180 | 210 |
लॉरीयर हेअर सिरम |
250 | 300 |
ट्रेसमी शॅम्पू | 150 | 175 |
या काळात सर्व ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड कंपन्यांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात लॅक्मे, कलर एसेन्स, मास्बुलिन, ब्लूहेवन, स्विस ब्युटी, गार्नियर, आयुर यांसारख्या नामांकित कंपन्यांची उत्पादने बरीच लोकप्रिय आहेत. तसेच निशा मेहंदी नावाच्या कंपनीचे हर्बल मेहंदीच्या क्षेत्रात चांगले नाव आहे. या सर्व कंपन्यांची उत्पादने सध्या प्रचंड वेगात असून याचे दर भरपूर प्रमाणात वाढले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याविषयीच्या 'या' नवीन गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात
- Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
- Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha