(Source: ECI/ABP News/ABP Majha)
3rd July 2022 Important Events : 3 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
3rd July 2022 Important Events : जुलै महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
3rd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 3 जुलैचे दिनविशेष.
3 जुलै : प्लास्टिक बॅग मुक्त दिन
'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन' दरवर्षी 3 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्यांबद्दल आणि जमिनीपासून ते सागरी जीवनापर्यंत नैसर्गिक पर्यावरणाला होणारा गंभीर धोका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी, लोक बैठका, वादविवाद, सामाजिक चर्चा आयोजित करतात आणि लोकांना वैयक्तिक पातळीवर प्लास्टिकच्या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी शपथ घेण्यास प्रोत्साहित करतात. पर्यावरणाला प्लास्टिक पिशव्यांपासून मुक्त करण्यासाठी लोक या दिवशी समुद्रकिनारा स्वच्छ अभियान, समुद्र स्वच्छ अभियान राबवतात.
3 जुलै : विनायक चतुर्थी
आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीचा उपवास रविवार, 3 जुलै रोजी आहे. या दिवशी बाधा श्री गणेशाची विधिवत पूजा करतात. विशेष म्हणजे ही पूजा दुपारपर्यंत पूर्ण होते. कारण या व्रतामध्ये चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. यावेळी विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी दोन शुभ योग तयार होत आहेत. रवियोग आणि सिद्धी योग कामात यश देणार आहेत.
1852 : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
1909 : कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म.
1350 : संत नामदेव यांनी समाधी घेतली.
2000 : विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.
1850 : साली भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्लंड देशातील इस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केलं. भारतावर राज्य करीत असतांना त्यांनी आपल्या देशांतील बहुमोल्य हिरा कोहिनूर आपल्या सोबत घेऊन गेले.
1998 : साली प्रसिद्ध भारतीय गीतकार व कवी तसचं, ऐ मेरे वतन के लोगों या देशभक्तीपर गीताचे रचनाकार कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :