(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Interview Tips : मुलाखतकाराला कसं इम्प्रेस करायचं? 30,000 हून अधिक मुलाखती घेणार्या सीईओकडून जाणून घ्या खास 3 टिप्स...
Interview Tips : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी जेव्हा भरती करणार्या लोकांबद्दल आणि मुलाखतकारांबद्दल माहिती मिळवली असते किंवा अभ्यास केला असतो तेव्हा तो नेहमीच प्रभावित होतो.
Interview Tips : नोकरी मिळवण्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मुलाखत. तुमची मुलाखत जर चांगली झाली असेल तर तुम्हाला नोकरी मिळवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. पण चांगली मुलाखत म्हणजे नेमकी कशी असावी? मुलाखत देताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे? कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे? इथपासून ते मुलाखतीला जाताना आपला पेहराव कसा असावा? या संदर्भात विल्यम वँडरब्लोमेन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
विल्यम वँडरब्लोमेन यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 30,000 हून अधिक नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. एक्झिक्युटिव्ह सर्च फर्म वँडरब्लोमेन सर्च ग्रुपच्या सीईओला असे आढळून आले की तुम्ही पात्र असलात तरीही भरती करणाऱ्या लोकांना तुम्ही एखाद्या भूमिकेसाठी योग्य वाटणार नाही.
नोकरदार व्यवस्थापकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, तुम्हाला सुरुवातीपासूनच एक मैत्रीपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि व्यावसायिक वर्तन दाखवणं आवश्यक आहे. तर, नोकरीच्या मुलाखतीदरम्यान नियुक्त व्यवस्थापकास त्वरित प्रभावित करण्यासाठी खास 3 टिप्स आहेत.
1) प्रसंगानुसार पोशाख परिधान करा
आजकाल अनेक ठिकाणी ऑनलाईन मुलाखती होतात. अशा वेळी साधे कपडे परिधान करून तुम्ही मुलाखतीला बसलात तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला इंम्प्रेस करू शकणार नाही. कारण तुमची वेशभूषा आणि तुमचा आत्मविश्वास हा देखील मुलाखती दरम्यान फार महत्त्वाचा असतो. असे व्हँडरब्लोमेन यांनी प्रकाशनाला सांगितले.
कॅमेऱ्याला सामोरे जात असताना तुम्ही जरी तुमच्या धडापर्यंत प्रोफेशनल कपडे परिधान केले असले तरी तुम्ही घरी परिधान केलेल्या कॅज्युअल कपड्यांची एक झलक रिक्रूटर्सनी पाहिल्यास गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात. "काही मुलाखतकार तुम्हाला व्हिडिओ कॉल दरम्यान उभे राहण्यास सांगू शकतात, तुम्ही प्रोफेशनल पोशाख परिधान करत आहात हे तपासण्यासाठी," व्हँडरब्लोमेन म्हणाले.
"जर तुम्हाला खरोखरच नोकरीची आवश्यकता असेल तर त्यासाठी चांगले प्रोफेशनल कपडे परिधान करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या कामाबाबत किती गांभीर्याने बघता हे देखील दर्शवणारा तो एक मार्ग असतो". असं व्हँडरब्लोमेन म्हणाले.
2) कंपनीबद्दल योग्य माहिती मिळवा, संशोधन करा
बहुतेक उमेदवार ज्या नोकरीसाठी ते मुलाखत देणार आहेत, ती कंपनी कशी आहे, कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे या सगळ्यावर मूलभूत संशोधन करतात, वँडरब्लोमेन म्हणाले. तसेच, काही लोक मुलाखतकाराबद्दल अधिक माहिती जाणून घेतात.
सीईओने सीएनबीसी मेक इटला सांगितले की जेव्हा नोकरी शोधणार्यांनी भर्ती आणि मुलाखतकारांबद्दल परिपूर्ण अभ्यास केला असतो आणि कंपनीच्या ताज्या बातम्यांबद्दल अपडेट असतात तेव्हा ते नक्कीच प्रभावित करू शकतात. मुलाखतीच्या पहिल्या 5-10 मिनिटांत तुम्ही तुमचं हे कौशल्य मुलाखतकाराला दाखवू शकता. तरच तुमच्या पुढे जाण्याच्या संधी वाढतात.
3) पगाराबद्दल केव्हा विचारायचे हे माहित असणं आवश्यक आहे.
मुलाखत देताना कधीही पहिला मुद्दा पगाराचा काढू नका. यामुळे तुमचं चुकीचं इम्प्रेशन जाईल. असे वँडरब्लोमेन म्हणाले. तुम्ही सांगण्यापेक्षा तुमचा इंटरव्ह्यू इतका छान झाला पाहिजे की मुलाखत घेणाऱ्याने तुम्हाला समोरून पगाराबद्दल विचारलं पाहिजे. किंवा तुम्ही मुलाखतीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत तुम्ही हा विषय मांडू शकता.
नोकरीत पगार जरी महत्त्वाचा असला तरी सर्वात आधी तुमचं बाहेरील व्यक्तिमत्त्व, तुमचा गेट अप, तुमची बोलण्याची पद्धत आणि तुमचं ज्ञान किती गरजेचं आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे असं व्हँडरब्लोमेन म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :