27th May 2022 Important Events : 27 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
27th May 2022 Important Events : मे महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
27th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 27 मे चे दिनविशेष.
1964 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन.
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी होते. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला. 1964 साली ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. नेहरूंनी समाजवादी समाजरचनेचे ध्येय काँग्रेस पक्षाला दिले.
1957 : भारतीय राजकारणी आणि उद्योजक नितीन गडकरी यांचा जन्म.
नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या 16व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून ते निवडून आले. ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. इ.स. 2009 साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले.
1935 : रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत 'रमाई' संबोधतात.
1906 : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना 27 मे 1906 रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते आणि सहभागी होते. त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे आणि साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.
1931 : पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित डॉ. ओट्टाप्लाक्कल नीलकंदन वेलु कुरुप यांचा जन्म.
1931 साली पद्मश्री, पद्मविभूषण तसेच, संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय लेखक, कवी, नाटककार, अनुवादक, आणि गीतकार डॉ. ओट्टाप्लाक्कल नीलकंदन वेलु कुरुप यांचा जन्मदिन.
1938 : भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखक, कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिन.
भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म 27 मे 1938 रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. कोसला पासून हिन्दूपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ते आहेत.
महत्वाच्या बातम्या :