एक्स्प्लोर

दररोज 9 तास झोपा 10 लाख रुपये कमवा, 'या' कंपनीनं सुरु केली अनोखी ऑफर, जाणून घ्या सविस्तर माहिती

फक्त झोपा आणि लाखो रुपये मिळवा असा अनोखा प्रकार एका कंपनीने सुरु केला. तुम्हाला याबाबत आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

Sleep Internship  News : फक्त झोपा आणि लाखो रुपये मिळवा असा अनोखा प्रकार एका कंपनीने सुरु केला. तुम्हाला याबाबत आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. वेकफिट कंपनीने एक अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे. या कंपनीने "स्लीप इंटर्नशिप" चा पाचवा सीझन लाँच केला आहे. ज्यामध्ये निवडलेल्या लोकांना दररोज 9 तास झोपावे लागणार आहे. त्या बदल्यात त्यांना 10 लाख रुपये मिळू शकतात. या ऑफरचा उद्देश लोकांना झोपेचे महत्त्व समजावून सांगणे आहे.

दररोज 9 तास झोपावे लागणार

वेकफिट ही देशातील प्रसिद्ध फर्निचर आणि गाद्या बनवणारी कंपनी आहे. या कंपनीने अनोखी इंटर्नशिप आणली आहे, ज्यामध्ये तुमचे एकमेव काम झोपणे असणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की दररोज 8 ते 9 तास ऑफिसच्या खुर्चीवर बसल्याने झोप येते. डोळे बंद करावेसे वाटतात, पण तुम्हाला काम करावे लागते. पण जर ती झोप तुमची "नोकरी" बनली तर काय? वेकफिट ही संधी देत ​​आहे. कंपनीने त्यांच्या "स्लीप इंटर्नशिप" चा पाचवा सीझन सुरु केला आहे. यामध्ये निवडलेल्या लोकांना कंपनीच्या नवीन गाद्यांवर दररोज 9 तास झोपावे लागेल. एवढेच नाही तर झोपताना तुम्हाला त्या गाद्यांबद्दलचा तुमचा अनुभव कंपनीला सांगावा लागेल. म्हणजे तुमच्या झोपेचा फायदा कंपनीला होतो आणि तुम्हाला पैसे मिळतात.

झोपण्याचे किती पैसे मिळतील?

आता प्रश्न असा आहे की या "स्लीप जॉब" मध्ये तुम्ही किती पैसे मिळणार. निवडलेल्या इंटर्नना 10 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जातील असे कंपनीने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच तुम्ही जितके चांगले झोपाल तितके तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. वेकफिटने अशी ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या चार हंगामात अनेकांनी या अनोख्या कामातून खूप कमाई केली आहे. 

कसा कुठ कराल अर्ज?

जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही झोपण्यात चॅम्पियन आहात, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. कंपनीने ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त इंटरनेटवर वेकफिट स्लीप इंटर्नशिप शोधावी लागेल. वरच्या लिंकवर क्लिक करा. तिथे अप्लाय नाऊचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्याने एक फॉर्म उघडेल. त्यात तुमची माहिती भरा आणि सबमिट करा. फॉर्ममध्ये, तुम्हाला हे देखील विचारले जाईल की कंपनीने तुम्हाला या भूमिकेसाठी का निवडावे. म्हणजेच, तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही सर्वोत्तम "स्लीपर" का आहात. जर तुमचे उत्तर कंपनीच्या व्हिजनशी जुळत असेल, तर तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget