(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPSC Recruitment 2023 : UPSC मध्ये तज्ज्ञ पदांसाठी जागा, फक्त 25 रुपयांत अर्ज करा; 'ही' आहे शेवटची तारीख
UPSC Recruitment 2023 : केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाने विविध तज्ञ पदांवर भरती जाहीर केली आहे. ज्यामध्ये ऍनेस्थेसियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक मेडिसिन आणि सर्जन या क्षेत्रातील तज्ञांची गरज आहे.
UPSC Recruitment 2023 : Union Public Service Commission of India (UPSC) ने विविध तज्ञ पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे. UPSC upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. एकूण 87 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या पदांवर शास्त्रज्ञ, अभियंता, आयटी तज्ञ आणि इतर तांत्रिक तज्ञांची भरती केली जाईल. ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांना वय आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागेल. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
पदांची संख्या
स्पेशालिस्ट ग्रेड 3 (अनेस्थेसियोलॉजी) – 46 पदे
स्पेशालिस्ट ग्रेड 3 (बायोकेमिस्ट्री) – 1 पद
स्पेशालिस्ट ग्रेड 3 (फॉरेन्सिक मेडिसिन) – 7 पदे
स्पेशालिस्ट ग्रेड 3 (मायक्रोबायोलॉजी) – 9 पदे
स्पेशालिस्ट ग्रेड ३ (पॅथॉलॉजी) – 7 पदे
स्पेशालिस्ट ग्रेड 3 (प्लास्टिक सर्जरी आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया) – 8 पदे
अर्ज शुल्क किती?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 25 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. फक्त महिला उमेदवार, SC/ST च्या उमेदवार आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. अर्ज फी भरण्यापासून. ऑनलाईन किंवा SBI च्या कोणत्याही शाखेत रोख जमा करून फी भरता येते. अर्जाशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही UPSC वेबसाईटला भेट देऊ शकता.
अर्ज कसा करायचा?
या पदांसाठीचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, UPSC www.upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- सर्वात आधी वेबसाईटवर दिलेल्या "Apply Online" या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर ऑनलाईन अर्ज ओपन होईल, जिथे तुम्हाला तुमचे लॉगिन तयार करावे लागेल.
- येथे विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- फॉर्ममध्ये कोणतीही चूक नसल्यास, अंतिम फॉर्म सबमिट करा.
- एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्ही त्याची प्रिंट आउट घेऊ शकता.
पात्रता
या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विशिष्ट वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागेल. यासाठी, उमेदवाराचे किमान वय 30 वर्ष आणि कमाल वय 50 वर्ष असावे. पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, तर उमेदवाराकडे वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत सूचना पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
2023 मध्ये नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांची घट, नेमकी काय आहेत कारणं? 2024 मध्ये कशी असेल स्थिती?