SSC GD Constable Vacancy 2022: SC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती, SSC कडून रिक्त जागांची नवी यादी जाहीर
SSC GD Constable Vacancy 2022: एसएससीने जीडी कॉन्स्टेबलची सुधारित रिक्त जागांसाठी नोटीस जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही. ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात
SSC GD Constable Vacancy 2022 : SSC GD Constable Recruitment 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. एसएससीने जीडी कॉन्स्टेबलसाठी सुधारित जागा जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत भरतीमध्ये 20,000 हून अधिक नवीन पदे भऱण्यात येणार आहेत. SSC ने जारी केलेल्या नवीन यादीनुसार एकूण 45,284 पदे या भरतीद्वारे भरली जातील.
सुधारित रिक्त जागांसाठी नोटीस जारी
एसएससीने जीडी कॉन्स्टेबलची सुधारित रिक्त जागांसाठी नोटीस जारी केली आहे. आयोगाने रिक्त पदांची संख्या 45 हजारांहून अधिक केली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या 45284 जागांमध्ये 40,274 जागा पुरुष उमेदवारांसाठी, 4835 जागा महिलांसाठी आणि 175 जागा NCB साठी आहेत. या अंतर्गत बीएसएफच्या 20,756, सीआयएसएफच्या 5914, सीआरपीएफच्या 11,169, एसएसबीच्या 2167, आयटीबीपीच्या 1787, आसाम रायफल्सच्या 3153 आणि एसएसएफच्या 154 रिक्त जागांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी SSC.NIC.IN संकेतस्थळावर तपासू शकता.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
यापूर्वी एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीद्वारे 24,369 पदं भरली जाणार होती. त्याच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त मंडळातील 10 वी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. सध्या, आयोगाने जारी केलेली सुधारित रिक्त पदांची यादी येथे तपासली जाऊ शकते.
20 हजारांहून अधिक रिक्त जागा वाढवल्या
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने GD कॉन्स्टेबल भर्ती 2022 अंतर्गत 20 हजारांहून अधिक रिक्त जागा वाढवल्या आहेत. SSC कॉन्स्टेबल GD 2022 ची सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्या उमेदवारांनी CAPF मध्ये कॉन्स्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये SSF, रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो परीक्षा, 2022 मध्ये शिपाई या पदांसाठी अर्ज केला आहे ते ssc.nic.in या SSC च्या अधिकृत साइटद्वारे सुधारित रिक्त जागा तपासू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर
SSC GD कॉन्स्टेबल भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही. ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.