SAIL Recruitment 2022: इंजिनिअरिंग पूर्ण झालंय? नोकरी शोधताय? SAIL मध्ये बंपर भरती झटपट अर्ज करा
SAIL Jobs 2022: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियानं भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया एकूण 17 पदं भरणार आहे.
SAIL Jobs 2022: जर तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियानं भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सेलमधील अनेक पदांवर भरती होणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज भरून खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. ही भरती मोहीम 14 डिसेंबर 2022 पर्यंत चालणार आहे. या भरती मोहिमेद्वारे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया एकूण 17 पदं भरणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech पदवी आणि इतर विहित पात्रता आणि संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, पदानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 35/37 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. उमेदवारांचं वय 14 डिसेंबर 2022 च्या आधारे मोजले जाईल.
कशी होणार निवड?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी (संगणक आधारित चाचणी) / मुलाखतीद्वारे केली जाईल.
अर्ज शुल्क
भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना 700 रुपये शुल्क जमा करावं लागणार आहे.
अर्ज कसा करायचा?
या भरती मोहिमेसाठी पात्र आणि योग्य उमेदवारांनी त्यांच्या अर्जांच्या स्वयं-साक्षांकित प्रती 14 डिसेंबर 2022 पर्यंत उपमहाव्यवस्थापक ब्लॉक 'ई', तळमजला प्रशासन इमारत, राउरकेला स्टील प्लांट, राउरकेला येथे नोंदणीकृत पोस्ट/ स्पीड पोस्ट/ कुरियरद्वारे पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईट www.sail.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मध्य प्रदेशमध्ये 134 पदांसाठी भरती करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट http://www.nhmmp.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल आणि 26 डिसेंबर 2022 पर्यंत चालेल.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ESIC Jobs 2022: ESIC मध्ये मोठी भरती; Walk in Interview मधून होणार निवड