NHAI Recruitment 2024 : 2 लाखांपेक्षा जास्त पगाराची नोकरी, वयोमर्यादाही जास्त, NHAI मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज
NHAI Recruitment 2024 : जे उमेदवार NHAI च्या या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांची वयोमर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
NHAI Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये नोकरी (Government Job) मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या ठिकाणी उपमहाव्यवस्थापक (प्रशासन), उपमहाव्यवस्थापक (कायदा), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि व्यवस्थापक (तांत्रिक) अशा विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झली आहे. तरी जे कोणी उमेदवार पात्र आहेत, तसेच इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाईटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी नेमका अर्ज कसा करायचा? तसेच, आवश्यक पात्रता काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
NHAI भर्ती 2024 द्वारे एकूण किती पदांसाठी जागा?
NHAI भर्ती 2024 द्वारे भरतीसाठी एकूण 63 पदे भरली जातील. जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक आहेत त्यांनी 15 एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. तुम्ही देखील NHAI मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुम्ही खाली दिलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता.
NHAI मध्ये 'या' पदांसाठी जागा
NHAI च्या या भरती अंतर्गत, उपमहाव्यवस्थापक (प्रशासन), उपमहाव्यवस्थापक (कायदा), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि व्यवस्थापक (तांत्रिक) अशी एकूण 63 पदे भरण्यात येणार आहेत.
NHAI मध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती असावी? (Age)
जे उमेदवार NHAI च्या या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांची वयोमर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
NHAI भरती 2024 द्वारे निवडलेल्या उमेदवारांना पगार किती? (Salary)
या ठिकाणी जे उमेदवार निवडले जातील त्यांना 78800 रुपये ते 209200 रुपये इतका पगार दिल जाईल.
'अशी' होणार निवड
तुम्हाला जर NHAI मध्ये काम करायचं असेल तर यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. तर, यासाठी तुम्हाला संबंधित कागदपत्र वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. या ठिकाणी त्याची पडताळणी करून तुम्हाला वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल, मुलाखतीद्वारे तुमची निवड परीक्षा होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
जे उमेदवार NHAI भरती 2024 अंतर्गत या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी पद्धतशीरपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा तसेच त्याची प्रिंट आऊट घेऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावीत आणि संबंधित कागदपत्रे दिलेल्या अर्जावर पाठवावीत. तरी, जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :