शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा
Teacher Recruitment 2023: राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची लवकरच जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यातील लाखो उमेदवारांचं रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लक्ष लागलं आहे.
राज्यात (Maharashtra News) शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात (Maharashtra Teacher Recruitment Updates)
गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली होती. पण आता अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून 23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात तारीख जरी अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली, तरी यासंदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत बिंदूनामावली सोबतच इतर काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. तसेच, राज्यातील शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भातील संकेतस्थळ असलेल्या पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहितीही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शिक्षण भरती प्रक्रियेतील घडामोडींना वेग
राज्यातील लाखो उमेदवारांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांच्या जाहीरातीकडे लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भाती घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Teacher Recruitment : 23 जिल्ह्यात शिक्षकांची 30 हजार रिक्त पदं भरणार, दीपक केसरकर यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI