Vacancy 2022 : फ्रेशर आहात? नोकरी शोधताय? इथे आहे भरती, परीक्षा न घेता होणार निवड, उद्या शेवटची तारीख
Ordnance Factory Chandrapur Vacancy 2022 : ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा येथे नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पदवीधर आणि पदविकाधारक उमेदवारांसाठी शिकाऊ पदासाठी भरती सुरू आहे.
Ordnance Factory Chandrapur Vacancy 2022 : ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा येथे नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पदवीधर आणि पदविधारक उमेदवारांसाठी शिकाऊ पदासाठी भरती सुरू आहे. ज्या उमेदवारांना ऑर्डनन्स फॅक्टरी अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज डाऊनलोड करून अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा. महत्त्वाची बाब म्हणजे, शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेला कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही. उद्या म्हणजेच, 31 मार्च ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी, चांदा, चंद्रपूर, महाराष्ट्र – 442501
रिक्त जागांचा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 36 पदं भरण्यात येणार आहेत. यापैकी 06 पदं पदवीधर शिकाऊ म्हणजे, पदवीधर अभियंता आणि 30 पदं तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारांसाठी म्हणजेच, डिप्लोमा धारकांसाठी आहेत.
पात्रता
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी विद्यापीठातून पदवी किंवा पदविका घेतलेली असणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही अंतिम वर्ष उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. निवड अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे केलेल्या गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या पदांसाठी किमान वयोमर्यादा 14 वर्ष आहे. उच्च वयोमर्यादेचा कोणताही नियम नाही.
पगार
या पदांवर निवड झाल्यावर उमेदवारांना पदांनुसार, वेतन मिळेल. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी दरमहा 9,000 रुपये आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी 8,000 रुपये प्रति महिना दिले जातील.
शेवटची तारीख
ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा येथील या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : शिक्षण क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, वाचा डिटेल्स
- Job Majha : बँक ऑफ बडोदा आणि NTPC मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज
- Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? ही बातमी वाचाच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha