Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असून केवळ माहिती नसल्याने संधी हुकते. पहा कोणत्या पदांसाठी काय आहे पात्रता?
Kokan Railway Job Update: तुम्हालाही जर रेल्वेत करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती सुरू असून आता अर्जासाठी आठवड्याहूनही कमी वेळ उरलाय. कोकण रेल्वेच्या 11 पदांसाठी सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून दहावी उत्तीर्ण ते कोणत्याही शाखेतील तसेच इंजिनिअरिंगची पदवी असणारी पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले असून कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज 16 सप्टेंबरपासून करता येणार आहे.
अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असून केवळ माहिती नसल्याने संधी हुकते. शिक्षणाची पात्रता अर्जाची अंतिम तारीख तसेच विविध पदांच्या भरती प्रक्रिया कधी सुरू झाल्यात यासाठी एबीपी माझा न पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
कोणत्या पदांसाठी सुरू आहे भरती?
कोकण रेल्वे मध्ये एकूण 11 पदांसाठी भरती सुरू असून सीनियर सिव्हिल इंजिनिअरसह टेक्निशियन, सुपरवायझर अशा एकूण 190 जागांसाठी कोकण रेल्वे भरती करणार आहे. यातील एकूण 6 पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असून दोन इंजिनिअरिंग पदवीची पद सोडता 3 पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे.
कोणत्या वयोगटासाठी आहे भरती?
कोकण रेल्वेतील 190 जागांसाठी एक ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्ष असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. एससी, एसटीतील इच्छुक उमेदवारांना यात पाच वर्ष सूट देण्यात आली असून ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष सूट आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी...
कोकण रेल्वेतील भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार असाल तर यासाठी 59 रुपये अर्ज शुल्क असून अधिकृत संकेतस्थळावर यातील पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी नोटिफिकेशन निघाला असून अधिकृत संकेतस्थळावर 16 सप्टेंबर पासून अर्ज खुले होणार आहेत. हे अर्ज सहा ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहतील.
कोणत्या पदाला किती पगार?
कोकण रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार असल्याने पदानुसार पगार ठरवण्यात आला आहे. लेवल १च्या पदांसाठी १८००० रुपये, लेवल २ च्या पदांसाठी १९९०० रुपये तर लेवल ५ ते लेवल ७ च्या पदांसाठी ३५,४०० ते ४४९०० रुपयांदरम्यान पगार देण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेनं सांगितलंय.
शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुण नोकरीच्या शोधाला सुरुवात करतात. पण खूपदा प्रयत्न करुनही सर्वांना प्रत्यक्षात त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवणं हे आपल्याकडे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. भारतीय रेल्वेने मोठी भरती जाहीर केली आहे. विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. त्यामुळे तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर अजिबात वेळ न घालवता झटपट अर्ज करा.लॅब असिस्टंट, नर्सिंग सुपरिटेंडेंट, हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर , फार्मासिस्ट या पदासाठी भरती सुरू आहे.
हेही वाचा:
रेल्वेत नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी, जवळपास 1500 पदांवर भरती, आजच अर्ज करा