रेल्वेत नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी, जवळपास 1500 पदांवर भरती, आजच अर्ज करा
भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
भारतीय रेल्वे
Total: 1376 जागा
नर्सिंग सुपरिटेंडेंट
- शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (Nursing)
- एकूण जागा -713
- वयाची अट- 20 ते 43 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III
- शैक्षणिक पात्रता: B.Sc.(Chemistry), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा
- एकूण जागा - 126
- वयाची अट- 19 ते 36 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
फार्मासिस्ट
- शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण+D.Pharm
- एकूण जागा - 216
- वयाची अट- 20 ते 38 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
लॅब असिस्टंट ग्रेड II
- शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, DMLT
- एकूण जागा - 94
- वयाची अट- 18 ते 36 वर्षे
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in
शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुण नोकरीच्या शोधाला सुरुवात करतात. पण खूपदा प्रयत्न करुनही सर्वांना प्रत्यक्षात त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवणं हे आपल्याकडे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. भारतीय रेल्वेने मोठी भरती जाहीर केली आहे. विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. त्यामुळे तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर अजिबात वेळ न घालवता झटपट अर्ज करा.लॅब असिस्टंट, नर्सिंग सुपरिटेंडेंट, हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर , फार्मासिस्ट या पदासाठी भरती सुरू आहे.
हे ही वाचा :
शिक्षक व्हायचंय? 35 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, वेतन 70 हजार रुपये, अर्ज करण्याचे उरले फक्त 24 तास