Job Majha : पिंपरी-चिंचवड महापालिका, RCFL आणि NALCO मध्ये नोकरीच्या संधी, असा करा अर्ज
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 157, राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूरमध्ये 132, RCFL मध्ये 19 आणि NALCO 189 जागांसाठी भरती निघाली आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 157, राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूरमध्ये 132, RCFL मध्ये 19 आणि NALCO 189 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पोस्ट - आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता - 8 वी पास
एकूण जागा - 157
वयोमर्यादा - 25 ते 45 वर्ष
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख- 13,14,15,16,17,20 आणि 21 सप्टेंबर 2022
तपशील - www.pcmcindia.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर
पोस्ट- वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी M.B.B.S किंवा समतुल्य पदवी, MPW साठी G.N.M. कोर्स/ B.sc नर्सिंग, स्टाफ नर्ससाठी 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
एकूण जागा - 132
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख -6 सप्टेंबर 2022
तपशील - chanda.nic.in
RCFL (राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि.मुंबई)
पोस्ट - व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता - पदवी/MBA/MMS किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी
एकूण जागा - 19
वयोमर्यादा - 27 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2022
तपशील - www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the post of Management Trainees (Corporate Communication, Materials) या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लि. (NALCO)
पोस्ट - ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी हवेत. यात विविध विभागातल्या 189 जागांसाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech किंवा M.Sc. (केमिस्ट्री), GATE 2022
एकूण जागा - 189 (यात मेकॅनिकल ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनीसाठी 58 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 41 जागा, इंस्ट्रुमेंटेशनसाठी 32 जागा, मेटलर्जीसाठी 14 जागा, केमिकलसाठी 14 जागा, माइनिंग (MN)साठी 10 जागा, सिव्हिल (CE) साठी 7 जागा, केमिस्ट्री (CY)साठी 13 जागा आहेत. )
वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 सप्टेंबर 2022
तपशील - nalcoindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर menu मध्ये career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. notices वर क्लिक करा. जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)