Job Majha : दहावी पास उमेदवारांना संधी! नॅशनल हाऊसिंग बँक आणि दक्षिण मध्य रेल्वेत विविध पदांसाठी भरती
Job Majha : नॅशनल हाऊसिंग बँक आणि दक्षिण मध्य रेल्वेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेतील भरतीसाठी दहावी आणि आयटीआय पास झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
Job Majha : नॅशनल हाऊसिंग बँक (National Housing Bank) आणि दक्षिण मध्य रेल्वेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यातील नॅशनल हाऊसिंग बँकेत विविध पदांच्या 36 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. दक्षिण मध्य रेल्वेतील भरतीसाठी दहावी आणि आयटीआय (ITI) पास झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
NHB (नॅशनल हाऊसिंग बँक)
पोस्ट : उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधरसह CA/ अर्थशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी / MBA (HR)/ अभियांत्रिकी मध्ये पदवी, 2 वर्षांचा अनुभव
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.nhb.org.in
एकूण जागा : 10
पोस्ट : प्रादेशिक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : संगणक विज्ञानमध्ये पदवीधर पदवी किंवा समतुल्य, 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 08
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.nhb.org.in
पोस्ट : व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पदवीधरसह कायदा पदवी/ एम.फील./ पीएच.डी., 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 06
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.nhb.org.in
सहाय्यक महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधरसह CA, 12 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 05
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.nhb.org.in
दक्षिण मध्य रेल्वे
पोस्ट : अप्रेंटिस हवेत ( यात, AC मॅकेनिक, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, MMTM, MMW, पेंटर, वेल्डर यांचा समावेश आहे.)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 4103
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2023
तपशील : scr.indianrailways.gov.in
महत्वाच्या बातम्या