Job Majha : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस, यंत्र लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती
Job Majha : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस, यंत्र लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू करण्याात आली आहे.
![Job Majha : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस, यंत्र लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती job majha job opportunity in air india engineering services limited and yantra limited know in details Job Majha : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस, यंत्र लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/23/e0e0f34760bd921f1e7fdf7297e088a21677161503473290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Vacancy) संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर
> विविध पदांच्या 5 हजार 454 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - नॉन ITI
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण
एकूण जागा - 1 हजार 936
वयोमर्यादा - 24 वर्षांपर्यंत
लवकरात लवकर अर्ज करा.
अधिकृत वेबसाईट - www.yantraindia.co.in
> पोस्ट - एक्स ITI
शैक्षणिक पात्रता - NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण
एकूण जागा - तीन हजार 514
वयोमर्यादा - 24 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
लवकरात लवकर अर्ज करा.
अधिकृत वेबसाईट - www.yantraindia.co.in
AIESL (एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस)
विविध पदांच्या 371 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
एकूण जागा - 296
वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट - www.aiesl.in
पोस्ट - स्किल्ड टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI, एव्हिएशन क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 75
वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
नोकरीचं ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट - www.aiesl.in
उल्हासनगर महापालिका आणि कोल्हापूर नागरी बँक सहकारी असो. मध्ये नोकरीची संधी
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड
पोस्ट - क्लार्क
शैक्षणिक पात्रता - BCS, BCA, MCA, MBA
एकूण जागा - 40
वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण- सांगली, कोल्हापूर
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - kopbankassorecruit@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट - www.kopbankasso.com
उल्हासनगर महानगरपालिका
पोस्ट - वकील
शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचं उत्तम ज्ञान
एकूण जागा - 39
नोकरीचं ठिकाण - उल्हासनगर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 24 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट - www.umc.gov.in
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)