Job Majha : मेगा भरती सुरू, पोस्ट खात्यात हजारो जागांसाठी तर पिपरी चिंडवड महापालिका तसेच GAIL मध्ये नोकरीची संधी
Job Majha : पोस्ट खात्यात हजारो जागांसाठी भरती सुरू आहे. त्याचसोबत पिंपरी चिंचवड महापालिका आणि गेल इंडिया लिमिटेडमध्ये भरती सुरू आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोस्ट खाते, भारतीय सेना तसेच गेल इंडियामध्ये भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तर,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे
विविध पदांकरिता भरती
एकूण जागा : 386
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार समतुल्य
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
-----------------
भारतीय सेना, एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम
पदाचे नाव - NCC स्पेशल एंट्री
एकूण जागा : 55
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindianarmy.nic.in
---------------
गेल इंडिया लिमिटेड
282 जागा
विविध पदांकरिता भरती
शैक्षणिक पात्रता: पदांच्यानुसार समकक्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2022
gailonline.com
-----------
भारतीय टपाल विभाग
पोस्टमन 59,099 जागा
मेल गार्ड 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 37,539 जागा
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण संगणकाचे ज्ञान, आवश्यक
वयोमर्यादा- 18 ते 32 वर्षे.
इंडिया पोस्ट - indiapost.gov.in
मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा. तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा. स्वतःची नोंदणी करा.