एक्स्प्लोर
Job Majha : भारतीय पोस्ट ऑफिस, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha : भारतीय पोस्ट ऑफिस, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीमध्ये भरती सुरू असून इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
भारतीय पोस्ट ऑफिस
- पोस्ट – ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर
- शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
- एकूण जागा – 38 हजार 926 (संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. ही संधी सोडू नका. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.)
- वयोमर्यादा – 40 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022
- तपशील - www.indiapost.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर मोठ्या अक्षरात संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. क्लिक करा. Notification मध्ये descriptive notification वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भारतीय पोस्ट ऑफिस, मुंबई
विविध पदांच्या नऊ जागा आहेत.
- पोस्ट – मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायरमन, लोहार
- शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI
- एकूण जागा – नऊ (यात मोटर मेकॅनिकसाठी 5 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 2 जागा आणि टायरमन, लोहारसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.)
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022
- तपशील - www.indiapost.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर Recruitment मध्ये read more वर क्लिक करा. २५ मार्चला जाहीर झालेल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड
विविध पदांच्या सात जागांसाठी भरती निघाली आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
पहिली पोस्ट – उपव्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एमसीएमधील चार वर्षांमध्ये किमान 50% गुण किंवा समतुल्य ग्रेड B.E./ B.Tech पदवी
- एकूण जागा – दोन
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष
- अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022
दुसरी पोस्ट - सहायक व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील किमान 50 % गुणांसह पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता.
- एकूण जागा – 03
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष
- अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022
- तपशील - www.canmoney.in
तिसरी पोस्ट - कनिष्ठ अधिकारी
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही प्रवाहात किमान 50% गुण मिळवलेले पदवीधर
- एकूण जागा – 02
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष
- तपशील - www.canmoney.in
- नोकरीचं ठिकाण – मुंबई आणि बंगळुरु
- अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, सातवा मजला, मेकर चेंबर-III, नरीमन पॉईंट मुंबई– 400021
- तपशील - www.canmoney.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. GENERAL AND SPECIAL RECRUITMENT PROJECT 2022-23/01 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement