(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : BECIL आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये भरती सुरू; असा करा अर्ज
Job Majha : BECIL आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट्स इंडिया लि. आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, कसा अर्ज करावा याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,
BECIL ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट्स इंडिया लि.
विविध पदांच्या 378जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट – ऑफिस असिस्टंट
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 200
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
तपशील - www.becil.com
दुसरी पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपेरटर
शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा – 178
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
तपशील - www.becil.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. त्यात vacancies वर क्लिक करा. Advertisement number 131 मध्ये view details वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
कर्मचारी राज्य विमा महामंडळ
विविध पदांच्या 218 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये)
शैक्षणिक पात्रता - MD/MS किंवा पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयात किंवा संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी, ४ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 103
वय़ोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि रिजनल डायरेक्टर, ESI कॉर्पोरेशन, पंचदिप भवन, सेक्टर- 16, NIT, हरियाणा, फरिदाबाद – 121002
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 मे 2022
तपशील - esic.nic.in
दुसरी पोस्ट - असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये)
शैक्षणिक पात्रता - दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता, 4 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 115
वयोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि रिजनल डायरेक्टर, ESI कॉर्पोरेशन, DDA कॉम्प्लेक्स कम ऑफिस, तिसरा आणि चौथा मजला राजेंद्र प्लेस, राजेंद्र भवन, नवी दिल्ली - 110008
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 मे 2022
तपशील - esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर स्क्रोलिंगमध्ये advertisement for recruitment of teaching faculty यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
संबंधित बातम्या :