एक्स्प्लोर

Study In France : फ्रान्समध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे? मग त्यासाठी नेमकं काय करावं लागेल, वाचा सविस्तर...

Indian Student In France : 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना फ्रेंच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे.

Indian Students in France : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Indian Students) चांगली बातमी आहे. भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेण्याची संधी आहे. 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना फ्रेंच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही मोठी घोषणा केली. 

फ्रान्समध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे? मग 'हे' वाचा

सध्या सुमारे 25,000 परदेशी विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षण घेत आहेत. ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 10 हजार आहे. येत्या काळात फ्रान्स हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिलं आहे की, आम्ही सार्वजनिक शाळांमध्ये फ्रेंच शिकवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरु करत आहोत. त्याला ‘फ्रेंच फॉर ऑल, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर’ असं नाव देण्यात आलं आहे. फ्रेंच भाषा शिकविण्याच्या उद्देशाने नवीन केंद्रे उघडली जातील. 

भारतीय विद्यार्थी फ्रान्समध्ये शिकण्यासाठी कसे जाऊ शकतात आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागले, ते जाणून घ्या.

अभ्यासक्रम निवडा

जर तुम्हाला फ्रान्समध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोर्स निवडावा लागेल. तत्त्वज्ञान, कला, संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रात फ्रान्सचं शतकानुशतके महत्त्वाचं स्थान कायम आहे. सध्या फ्रान्स हा देश जागतिक व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. एमबीए, अभियांत्रिकी, फिल्म स्टडीज, लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि वैद्यकीय शिक्षण या विषयांचा अभ्यास फ्रेंच विद्यापीठांमध्ये करता येतो. त्यामुळे तुम्हालाही फ्रान्समध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी अभ्यासक्रम निवडावा लागेल. 

'या' परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक

फ्रेंच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी सामान्यतः TOEFL आणि IELTS सारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. यामध्ये चांगले गुण असतील तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. फ्रान्समधील अनेक विद्यापीठांमध्ये या दोन्ही परीक्षांचे गुण स्वीकारले जातात.

फ्रान्समध्ये अभ्यास करण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल?

  • सर्वप्रथम तुम्हाला Etudes en France या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
  • त्यानंतर कॅम्पस फ्रान्स कार्यालय शैक्षणिक पुनरावलोकनासाठी (Academic Review) तुमच्याशी संपर्क साधेल.
  • एकदा तुमची फाइल कॅम्पस फ्रान्स मॅनेजरने व्हेरिफिकेशन केली की, तुम्हाला विद्यापीठांकडून प्रतिसाद मिळणं सुरू होईल.
  • स्वीकृती पत्र मिळाल्यानंतर, व्हिसाची प्रक्रिया सुरू करावी लागेल.

शिष्यवृत्ती (Schlarship for Indian Students)

फ्रान्समध्ये अभ्यास करण्यासाठी कोर्स निवडल्यानंतर, तुम्हाला शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळावी. शिष्यवृत्ती मिळाल्यास तुमच्या खिशावर पडणारा शिक्षण खर्चाचा बोजा कमी होईल. फ्रेंच दूतावासाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंच सरकारने भारतीय विद्यार्थ्यांसाठी 'चारपक स्कॉलरशिप' (Charpak Scholarships) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. ही शिष्यवृत्ती पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, संशोधन इंटर्नशिप आणि एक्सचेंज सेमिस्टर विद्यार्थ्यांसाठी आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 5000 युरो पर्यंतचे शुल्क आणि 700 युरो पर्यंतचे खर्च समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी inde.campusfrance.org या लिंकला भेट देता येईल.

फ्रान्समध्ये शिक्षणासाठी किती खर्च येईल? (How much will it cost to study in France?)

विविध अहवालांनुसार, फ्रान्समधील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांची सरासरी फी प्रति वर्ष सुमारे 170 युरो आहे. तर पदव्युत्तर पदवीसाठी, तुम्हाला दरवर्षी सुमारे 260 युरो फी भरावी लागेल. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना अनुक्रमे सरासरी 450 युरो आणि 620 युरो द्यावे लागतील. याशिवाय पॅरिस व्यतिरिक्त इतर कोणत्याही शहरात खोली भाड्याने देण्याची किंमत सुमारे 200 युरो असू शकते. फ्रान्समध्ये बॅचलर डिग्री किंवा मास्टर्स करण्यासाठी दीर्घकालीन विद्यार्थी व्हिसाची फी सुमारे 99 युरो म्हणजेच भारतीय चलनात 7,582 रुपये आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सरकारी प्रवक्ता ते पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान; फ्रान्सचे पहिले समलिंग पंतप्रधान गॅब्रिएल अटल आहेत तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget