(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात 2800 पदांवर मोठी भरती; पण 'ही' अट, कसा कराल अर्ज?
Indian Navy SSR Recruitment 2022 : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 30 हजार रुपये पगार मिळेल.
Indian Navy SSR Recruitment 2022 : भारतीय नौदलानं अग्निवीर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2022 पासून सुरू केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार 22 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. ही भरती सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) अंतर्गत केली जाणार आहे.
रिक्त जागांचा तपशील
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे, भारतीय नौदलात अग्निवीरच्या 2800 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा.
महत्त्वाची माहिती
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पुरुष उमेदवारांची किमान उंची 157 सेमी आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेमी निश्चित करण्यात आली आहे.
वेतनश्रेणी
अग्निवीरच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये प्रारंभिक वेतन दिलं जाणार असल्याचं अधिसूनचनेत नमूद करण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया
बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवार निवडले जातील. त्यानंतर त्यांना लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावलं जाईल.
असा करा अर्ज
या पदांसाठी पात्र आणि पात्र उमेदवार 15 जुलै ते 22 जुलै 2022 या कालावधीत joinindiannavy.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.