एक्स्प्लोर

Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आधारित नवे निकष

Agni Veer Recruitment New Process : भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. यानुसार शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर दिला जाणार आहे.

Agniveer Recruitment Mentally and Physically Fit : भारतीय सैन्य दलाकडून (Indian Amry) भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. मानसिक स्वास्थ आणि शारीरिक स्वास्थ यांचा योग्य समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने (Indian Army) भरती प्रक्रियेत बदल केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (22 फेब्रुवारी) यासंदर्भात माहिती दिली आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणार असून यामध्ये शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. त्यासाठी लेखी प्रवेश परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केल्याची माहिती देत सांगितले की, मानसिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येईल. 

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड

भारतील लष्करातील भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. मात्र आता लेखी परीक्षा ही भरती प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे महत्त्वाचं असणार आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल. 

अग्निवीर भरतीसाठी 500 रुपये शुल्क

कर्नल सुरेश यांनी पुढे माहिती दिली की, भरती प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्य देणार आहे. तर उमेदवाराला फक्त 250 रुपये भरावे लागतील. 

भरती प्रक्रिया तीन टप्प्यात

अग्निवीर म्हणून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी वर्षातून एकदाच ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. त्यापूर्वी अर्ज दाखल करावा. सुधारित भरती प्रक्रियेनुसार, भरतीपूर्वी संगणकावर आधारित ऑनलाइन कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) घेतली जाईल. अग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई (CEE), शारीरिक चाचणी (Physical Test) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेण्यात येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; भरतीपासून ट्रेनिंगपर्यंतचे निकष, वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
Embed widget