एक्स्प्लोर

IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये 650 रिक्त पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी उरले दिवस

IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये 650 रिक्त पदांवर भरती सुरु आहे. अर्ज करण्यासाठी 24 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदत आहे.

IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये (IPPB) अनेक रिक्त पदांवर भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. कारण अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 650 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर यासह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2022 आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया 10 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली. तर यासाठी 24 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. उमेदवार ippbonline.com येथे अर्ज दाखल करु शकतात. 

रिक्त पदांचा तपशील

या भरत अंतर्गत एकूण 650 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा

  • मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 23 वर्ष तर कमाल वय 35 वर्ष असावे.
  • सीनियर मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 26 वर्ष तर कमाल वय 35 वर्ष असावे.
  • चीफ मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 29 वर्ष तर कमाल वय 45 वर्ष असावे.
  • असिस्टेंट जनरल मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 32 वर्ष तर कमाल वय 45 वर्ष असावे. 
  • डेप्युटी जनरल मॅनेजर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 23 वर्ष तर कमाल वय 55 वर्ष असावे.

अशी असेल निवड प्रक्रिया 

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत या पदांच्या भरतीसाछी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षेनंतर त्या उमेदवारांसाठी मंडळनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचीच या पदासाठी निवड केली जाईल.

अर्ज शुल्क

या भरती प्रक्रियेत अर्ज करणार्‍या उमेदवारांना अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. SC, ST, PWD अर्जदारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर सर्वांसाठी 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा करायचा, जाणून घ्या

  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडच्या ippbonline.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • अर्जासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता अर्जामध्ये अचूक माहिती आणि संपूर्ण तपशील भरा.
  • त्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क भरून तो जमा करावा.
  • आवेदन शुल्क भरा.
  • भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
Embed widget