तुम्हाला महिन्याला 1 लाख 36 हजार रुपये पगार पाहिजे? तर 'इथे' करा अर्ज
हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाने (HPPSC) शाळा व्याख्याताच्या 500 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
Government Job : काही दिवसापूर्वी, हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाने (HPPSC) शाळा व्याख्याताच्या 500 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली होती. यासाठी अर्ज केल्यानंतर लिंक बंद करण्यात आली होती. या संदर्भात आता ताजी अपडेट अशी आहे की HPPSC स्कूल लेक्चरर पदासाठी नोंदणी लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जे उमेदवार पूर्वीच्या संधीत अर्ज करू शकले नाहीत ते आता अर्ज करू शकतात.
आता HPPSC शाळा व्याख्याता पदासाठी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या पदासाठी मजबूत अशा प्रकारचा पगार देखील मिळणार आहे, महिना लाखाच्या पुढे पगार मिळवण्याची संधी या नोकरीतून मिळणार आहे.
जाणून घ्या या भरतीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर होती. ती आता 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण 585 पदांची भरती केली जाणार आहे. हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाने ही भरती केली आहे.
तुम्ही या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, ज्याचा पत्ता आहे – hppsconline.hp.gov.in.
याशिवाय आणखी एक वेबसाईट आहे जिथून तुम्ही तपशील जाणून घेऊ शकता. या वेबसाइटचा पत्ता आहे – hppsc.hp.gov.in.
ही पदे इंग्रजी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वाणिज्य विषयांसाठी आहेत.
अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 400 रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आहे.
जर निवड झाली तर पगार चांगला आणि स्तरानुसार आहे.
या पदावर निवड झाल्यास 40 हजार ते 1 लाख 36 हजार रुपये मिळू शकतात.
पदानुसार अर्ज करण्याची पात्रता बदलते. वेबसाइटवर त्याचे तपशील तपासा. 18 ते 45 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
First job: तुमची पहिली नोकरी असेल तर काय काळजी घ्याल? 'या' गोष्टी लक्षात ठेवा