(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ECIL Jobs 2022 : लोअर डिव्हिजन क्लर्क पदांवर मोठी भरती; ग्रेज्युएट असाल तर झटपट अर्ज करा
ECIL Recruitment 2022 : ECIL ने LDC पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
ECIL Recruitment 2022 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं (Electronics Corporation of India Limited) लोअर डिव्हिजन क्लर्कच्या रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. त्यासाठी कंपनीनं अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट ecil.co.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.
भरतीसाठी रिक्त जागांचा तपशील
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या भरती अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 11 पदांवर भरती केली जाईल. या भरती अंतर्गत सामान्य वर्गातील 5 पदं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 4 पदं आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 पद राखीव ठेवण्यात आलं आहे.
कोण अर्ज करु शकतं?
ईसीआईएलनं जारी केलेल्या या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांचं वय 28 वर्ष असावं. त्यावरील वयाच्या लोकांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार नाही. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह पदवीधर असावा. तसेच, उमेदवाराचा टाइप राइटिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट असावा.
निवड प्रक्रिया
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि स्किल टेस्टच्या आधारावर होणार आहे. या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल.
पगार
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार 480 रुपये वेतन दिले जाणार आहे.
अर्ज शुल्क
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :