ED Recruitment 2024 : ED मध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी, तब्बल दीड लाख पगार मिळणार; 'येथे' करा अर्ज
ED Recruitment 2024 : ED मध्ये या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
ED Recruitment 2024 : इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच (ED) अंमलबजावणी संचालनालय नोकऱ्या (Government Jobs) शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी ईडीने उपसंचालक ते ड्रायव्हर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांकडे या पदांशी संबंधित पात्रता आहे ते ईडीच्या अधिकृत वेबसाईट, enforcementdirectorate.gov.in वर अर्ज करू शकतात. या ईडी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या तरूणांना अर्ज करायचा आहे त्यांनी त्वरित अर्ज करा.
ईडीच्या या भरतीतून अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार 16 एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला ED मध्ये अधिकारी व्हायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता.
ED मध्ये नोकरी मिळविण्यासाठी पात्रता आणि वयोमर्यादा :
ED मध्ये या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही अर्ज करण्यास पात्र मानले जाऊ शकतात. यासोबतच वयोमर्यादेशी संबंधित सर्व तपशील अधिसूचनेत पाहता येतील.
ED मधील निवडीवर मिळणारा पगार :
या ED भरती अंतर्गत जे काही उमेदवार निवडले जातात, त्यांना वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन दिले जाईल.
मिळालेल्या एका अहवालानुसार, लेव्हल 11 डेप्युटी डायरेक्टरचा पगार 67,700 ते 2,08,700 रुपये आहे.
असिस्टंट लेजर ॲडव्हायझरचा पगारही 67,700 ते 2,08,700 रूपयांपर्यंत असतो.
जर आपण अंमलबजावणी अधिकाऱ्याबद्दल बोललो तर, ज्यांचा पगार 47600 रुपये ते 1,51,100 रुपये आहे.
असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसरबद्दल बोलायचे तर, त्यांचा पगार 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना आहे.
ईडी ड्रायव्हरचा पगार 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत असतो.
तर, कर्मचारी कार चालकाला अंमलबजावणी संचालनालयाकडून 19,900 ते 63,200 रुपये पगार मिळतो.
तुम्ही सर्वजण अंमलबजावणी संचालनालयाच्या वेबसाईटला भेट देऊन या नोकरीच्या पदांसाठी सहजपणे अर्ज करू शकता.
'अशा' प्रकारे ED मध्ये निवड केली जाईल
अंमलबजावणी संचालनालय (ED) भरतीची अधिसूचना आणि अर्जाचा फॉर्म enforcementdirectorate.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही परीक्षा चाचणी/मुलाखतीच्या आधारे ईडीची निवड केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांची दिल्लीत नियुक्ती केली जाईल. या पदांवर निवड झालेल्यांना एपीजे अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली, 110011 दिल्ली येथे काम करण्याची संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :