ECIL मध्ये 1600 पदांची भरती, लवकरात लवकर करा अर्ज, प्रति माह किती वेतन मिळणार?
ECIL Recruitment : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी आहे.
ECIL Recruitment : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने भरती जाहीर केली आहे. या भरतीअतंर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती कनिष्ठ तंत्रज्ञ (ज्युनियर टेक्निशियन) पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ecil.co.in/ ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1625 पदांची भरती करण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारिख : 01 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख : 11 एप्रिल 2022
भरतीसंदर्भातील आणखी माहिती :
- एकूण पदांची संख्या : 1625
- इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक : 814
- फिटर : 627
- इलेक्ट्रिशियन : 184
वेतन श्रेणी
या पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 20,480 रुपये, दुसऱ्या वर्षी 22,528 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 24,780 रुपये प्रति माह वेतन दिलं जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ फिटरच्या ट्रेडमध्ये ITI (2 वर्ष) असणं आवश्यक आहे. याशिवाय, एक वर्षाची अप्रेंटिसशिप (कौशल्य विकास मंत्रालयाने जारी केलेली NAC). निवडलेल्या उमेदवारांना ECIL च्या कोणत्याही कार्यालयात (संपूर्ण भारतात) आणि त्याच्या ग्राहकांच्या साईटवर नियुक्ती मिळू शकते. ITI मध्ये 1:4 च्या प्रमाणात मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे हैदराबाद येथे कागदपत्र सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
कसा कराल अर्ज?
ईसीआईएल (ECIL) ची अधिकृत वेबसाईट www.ecil.co.in/ वर भेट द्या.
करिअर टॅब आपोन करा आणि त्यानंतर ई-रिक्रूटमेंटवर क्लिक करा.
एक फॉर्म ओपन होईल, तिथे विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरा आणि सबमिट करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : BECIL आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळमध्ये भरती सुरू; असा करा अर्ज
- MPPEB Recruitment 2022 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3 हजाराहून अधिक पदांसाठी बंपर भरती; लवकर करा अर्ज
- IFS आधिकाऱ्याकडे असतात 'हे' अधिकार; जाणून घ्या काम, जबाबदाऱ्या काय असतात
- Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? मग 'या' ठिकाणी आहेत संधी; आजच अर्ज करा