एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pragya Mishra : ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतात मतदान होत असताना ओपनएआयने प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येणार की नाही हे या मतदानामुळे ठरणार आहे.

Chat GPT developer OpenAI Pragya Mishra : Chat GPT डेव्हलपर OpenAI कंपनीने भारतात पहिला कर्मचारी नियुक्त केला आहे. कंपनीने 39 वर्षीय प्रज्ञा मिश्रा यांची सरकारी संबंध प्रमुख ( Pragya Mishra as head of government relations) म्हणून नियुक्ती केली आहे. प्रज्ञा मिश्रा यांनी यापूर्वी Truecaller आणि Meta मध्ये काम केले आहे. महिन्याच्या शेवटी त्या OpenAI मध्ये काम सुरू करतील. ही नियुक्ती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. ब्लूमबर्गने आपल्या अहवालात या प्रकरणाशी परिचित लोकांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतात मतदान होत असताना ओपनएआयने प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येणार की नाही हे या मतदानामुळे ठरणार आहे.

प्रज्ञा गोल्फ खेळाडू आणि पॉडकास्टर देखील 

  • प्रज्ञा मिश्रा जुलै 2021 पासून Truecaller साठी सार्वजनिक व्यवहार संचालक म्हणून काम करत आहेत. या स्थितीत, त्यांना कंपनीचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सरकारी मंत्रालये, भागधारक, गुंतवणूकदार आणि मीडिया भागीदार यांच्याशी जवळून काम करावे लागेल. यापूर्वी  त्या 3 वर्षे Meta Platforms Inc. मध्ये होत्या. मेटामध्ये, प्रज्ञा यांनी 2018 मध्ये चुकीच्या माहितीच्या विरोधात WhatsApp च्या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांनी अर्न्स्ट अँड यंग आणि नवी दिल्लीतील रॉयल डॅनिश दूतावासातही काम केले आहे.
  • प्रज्ञा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्यांनी 2012 मध्ये इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले आहे. त्या दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून त्यांनी बार्गेनिंग आणि निगोशिएशनमध्ये डिप्लोमा देखील केला आहे.
  • प्रज्ञा गोल्फर सुद्धा आहेत. त्यांनी 1998 ते 2007 दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय हार्टफुलनेस मेडिटेशन ट्रेनर आहेत. त्या एक पॉडकास्टर आणि 35,000 फॉलोअर्ससह एक इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर आहे. 

OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन गेल्यावर्षी भारतात 

OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी गेल्या वर्षी भारताला भेट दिली होती. भारताच्या भेटीदरम्यान ते म्हणाले होते की, भारतासारख्या देशांनी एआय संशोधनाला अशा प्रकारे पाठिंबा द्यायला हवा की ते आरोग्य सेवेसारख्या सरकारी सेवांमध्ये सुधारणा करू शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली

या भेटीदरम्यान सॅम ओल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. ओपनएआयची जनरेटिव्ह-एआय सेवा चॅटजीपीटी स्वीकारणारा भारत हा पहिला देश आहे, असेही ओल्टमन म्हणाले.

ऑल्टमनने AI वर जास्तीत जास्त नियमन करण्यास सांगितले होते

ऑल्टमनने AI वर जास्तीत जास्त नियमन करण्यास सांगितले होते. मग ऑल्टमन म्हणाले की त्याची सर्वात मोठी भीती ही आहे की तंत्रज्ञान देखील हानी पोहोचवू शकते. तंत्रज्ञानाच्या सध्याच्या आवृत्तीत मोठ्या नियामक बदलांची आवश्यकता नाही, परंतु लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget