एक्स्प्लोर
Advertisement
RRB Recruitment 2024 : रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. अर्जाची प्रक्रिया मे, 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून, 2024 मध्ये संपणार आहे.
RRB Recruitment 2024 : भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड Indian Railways Railway Recruitment Board (RRB) 8 हजार प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. अर्जाची प्रक्रिया मे 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून 2024 मध्ये संपणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
नोकर भरतीचा तपशील
- पोस्ट : प्रवासी तिकीट परीक्षक: 8,000+
- वयोमर्यादा : किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय - 28 वर्षे
- पगार : रु. 27,400 ते रु. 45,600 असा अपेक्षित आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
कशी असेल निवड प्रक्रिया?
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- अर्ज फी
- सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी: रु. 500
- अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: रु. 300
अर्ज कसा करावा
- पहिल्यांदा indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या
- त्यानंतर latest ऑप्शनवर गेल्यानंतर Railway TTE recruitment 2024 सर्च करा
- Railway TTE recruitment Section मध्ये Apply Online link क्लिक करा
- येथे सर्व माहिती भरावी लागेल आणि पुढील बटणावर (Next Button) क्लिक करा
- आकारानुसार तुमचा फोटो आणि अंगठ्याचे ठसे अपलोड करा
- पुढील पेजवर, तुम्ही फी जमा करा आणि तुमची तारीख सेव्ह करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement