BSF Vacancy : सीमा सुरक्षा दलात अधिकारी होण्याची संधी, 2 लाख रुपये पगार; अर्ज कसा करायचा?
BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? सविस्तर माहिती वाचा.
मुंबई : सरकारी नोकरीच्या (Government Job) प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) अधिकारी होण्याची संधी आहे. बीएसएफ (BSF) कडून भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरकारी अधिकारी होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी अजिबात वेळ न दवडता, लगेचच या भरतीसाठी अर्ज दाखल करा. या भरतीअंतर्गत निवड झाल्यास पात्र उमेदवाराला दोन लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार bsf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. यासंबंधित इतर माहिती सविस्तर वाचा.
बीएसएफमध्ये अधिकारी होण्याची संधी
बीएसएफमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. सीमा सुरक्षा दलाने अभियंता आणि लॉजिस्टिक अधिकारी पदासाठी बीएसएफ एअर विंगमध्ये गट 'A' लढाऊ पदांसाठी भरती करण्यात येत असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या रिक्त पदांमध्ये उपमुख्य अभियंता, वरिष्ठ विमान देखभाल अभियंता आणि असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक्स) या पदांवर भरती करण्यात येत आहे. उमेदवार या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
बीएसएफ भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. या भरतीअंतर्गत एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्ही देखील या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर प्रथम खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचा.
बीएसएफमध्ये भरती 2024 : रिक्त पदे
- एकूण रिक्त पदे : 12 पदे
- उपमुख्य अभियंता - 3 पदे
- वरिष्ठ विमान देखभाल अभियंता - 7 पदे
- असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) - 2 पदे
BSF Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
सीमा सुरक्षा दलात अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
BSF Recruitment 2024 : वयाची अट
सीमा सुरक्षा दलात अधिकारी पदांवरील भरतीसाठी संबंधित उमेदवाराच्या वयाची वेगवेगळी असून खालीलप्रमाणे आहे.
- उपमुख्य अभियंता (डेप्युटी चीफ इंजीनियर) - वय 52 वर्षांपेक्षा अधिक नाही.
- सीनियर एयरक्राफ्ट मेंटेनेंस इंजीनियर- वय 50 वर्षांपेक्षा अधिक नाही
- असिस्टेंट कमांडेंट (लॉजिस्टिक)- वय 35 वर्षांपेक्षा जास्त नाही
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Vacancy) शोधात आहेत. मात्र अनेक वेळा पात्रता (Eligibility), शिक्षण (Education) असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (ABP Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या (Government Job News) भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.