एक्स्प्लोर

Income Tax Recruitment 2024: आयकर विभागात नोकरी मिळवण्याची नामी संधी; 56 हजारांहून अधिक मिळेल पगार

Income Tax Jobs : आयकर विभागानं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करणं आवश्यक आहे.

Income Tax Recruitment 2024: आयकर विभागानं (Income Tax Department) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देत भरती जाहीर केली आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते. आयकर विभागानं गट 'C' कॅडर अंतर्गत कॅन्टीन अटेंडन्ट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार tincometax.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करणं आवश्यक आहे.

आयकर विभाग या प्रक्रियेतंर्गत एकूण 25 पदं भरणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी, सर्वात आधी सर्व गाईडलाईन्स आणि पात्रतेच्या अटी काळजीपूर्व वाचाव्यात. 

Income Tax Recruitment 2024: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 

आयकर विभागातील भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिकचं प्रमाणपत्र (दहावी) किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून त्यांच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय असेल? 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं. ही वयोमर्यादा 22 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू असेल. सरकारी नियमांनुसार, वयात सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी काय असेल? 

निवडलेल्या उमेदवारांना 18 हजार रुपये ते 56 हजार 900 रुपये प्रति महिना पगार मिळेल, जो सरकारी वेतनश्रेणीनुसार दिला जाईल. 

निवड कशी केली जाईल? 

आयकर विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, या भरतीसाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांच्या कामगिरीनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज कसा कराल? 

इच्छुक उमेदवार आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट tnincometax.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानं सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून ठेवावीत. या अभियानांतर्गत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात. 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.      

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिषABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 05 January 2025Job Majha | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात निम्न श्रेणी लिपिक पदावर भरती ABP MajhaVIDEO |  100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Embed widget